मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! तानसा तलाव भरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 04:24 IST2020-08-21T04:24:03+5:302020-08-21T04:24:13+5:30

बुधवारी रात्री मोडक सागर भरून वाहू लागला होता. आतापर्यंत चार तलाव भरल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

Mumbaikars' water worries allayed! Lake Tansa filled up | मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! तानसा तलाव भरला

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! तानसा तलाव भरला

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव गुरुवारी सायंकाळी ७.०५ मिनिटांनी भरून वाहू लागला आहे. बुधवारी रात्री मोडक सागर भरून वाहू लागला होता. आतापर्यंत चार तलाव भरल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
याआधी तुळशी आणि विहार हे दोन सर्वात लहान तलाव भरून वाहू लागले होते. मात्र त्यानंतरही तलाव क्षेत्रात ५० टक्कयांहून कमी जलसाठा असल्याने पाण्याचे टेन्शन वाढले होते. यामुळे पालिका प्रशासनाने ५ आॅगस्टपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू केली होती. परंतु मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी तलाव क्षेत्रात १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. सध्या तलाव क्षेत्रात १२ लाख ६२ हजार ११९ दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी २१ आॅगस्टपासून मुंबईतील २० टक्के पाणीकपात कमी करून १० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.
>२० आॅगस्ट रोजी तलावांमध्ये जलसाठा
वर्ष जलसाठा टक्के
(दशलक्ष लिटर)
२०२० १२६२११९ ८७.२०
२०१९ १३७०४३१ ९४.६८
२०१८ १३३४९८२ ९२.२४
तलाव कमाल किमान उपायुक्त सध्या
(दशलक्ष) साठा
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ १२८९२५ १६३.१५
तानसा १२८.६३ ११८.८७ १३७८१५ १२८.६३
विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८ ८०.३०
तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ १३९.२६
तलाव कमाल किमान उपायुक्त सध्या
(दशलक्ष) साठा
अप्पर ६०३.५१ ५९७.०२ १६३२९९ ६०१.५३
वैतरणा
भातसा १४२.०७ १०४.९० ६१४५९५ १३८.२४
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १८१७४१ २८२.९५

Web Title: Mumbaikars' water worries allayed! Lake Tansa filled up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.