Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधारेने मुंबईकरांना धडकी; राज्यात पुढचे ४ दिवस पावसाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 06:36 IST

पुण्यातही जोरदार बरसला

मुंबई : मुंबईसह ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरात शुक्रवारी संध्याकाळी जोरदार झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईसह कोकण, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. मुंबईत संध्याकाळी २६ जुलै २००५ च्या पावसाची आठवण झाली. पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. कोयना धरणाचा पाणीसाठा ५४ टीएमसी झाला आहे.

वसई पश्चिमेकडील भुईगाव समुद्रकिनारी सहलीसाठी गेलेले दोन तरुण बुडाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. हवाई वाहतुकीवर परिणाम झाला विमानतळावरून होणाऱ्या वाहतुकीलाही फटका बसला. 288 विमानांना36 मिनिटे विलंब झाला. 110 विमानांचे टेक ऑफ विलंबाने झाले.

टॅग्स :पाऊस