मुंबईकरांची आठवडाभर सत्त्वपरीक्षा, आजपासून पश्चिम रेल्वेच्या ३१६ लोकल फेऱ्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 02:10 PM2023-10-30T14:10:27+5:302023-10-30T14:10:45+5:30

मुंबईकरांना मेगा त्रास, पश्चिम रेल्वेचे सात कोटींवर पाणी

Mumbaikars sattvaparikam for a week, 316 local trains of Western Railway canceled from today | मुंबईकरांची आठवडाभर सत्त्वपरीक्षा, आजपासून पश्चिम रेल्वेच्या ३१६ लोकल फेऱ्या रद्द

मुंबईकरांची आठवडाभर सत्त्वपरीक्षा, आजपासून पश्चिम रेल्वेच्या ३१६ लोकल फेऱ्या रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पश्चिम रेल्वेने खार-गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या बांधकामासाठी ब्लॉक सुरू केल्याने ६ नोव्हेंबरपर्यंत लोकलच्या तब्बल १७८३ फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. परंतु,  सोमवारपासून दररोज ३१६ फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.  त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची परवड होणार आहे.

खार ते गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यत लोकलच्या तब्बल दोन हजार ५२५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.  २७ ते २९ ऑक्टोबर या तीन दिवसांतील ब्लॉक कालावधीत शनिवार-रविवार कार्यालयांना सुट्टी असल्याने फारसा परिणाम जाणवला नाही. सोमवारपासून दररोज ३१६ फेऱ्या रद्द केल्या जाणार असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे.  पश्चिम रेल्वेवर प्रतिदिन १३९४ लोकल चालविण्यात येतात. 

या स्थानकांत गर्दीची शक्यता

  मेगाब्लॉकमुळे दादर, अंधेरी, कांदिवली, मालाड या स्थानकांवर गर्दी होण्याची अधिक शक्यता आहे.
  गर्दी नियंत्रणासाठी स्थानकांवर आरपीएफचे जवान आणि जीआरपी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. 
  प्रवाशांना वारंवार ब्लॉकबाबत अपडेट करण्यात येणार आहे. 
  प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टने अतिरिक्त बस सोडाव्यात यासाठी पश्चिम रेल्वेने बेस्टशी संपर्क साधल्याचा दावा एका अधिकाऱ्याने केला. 

पश्चिम रेल्वेचे सात कोटींवर पाणी

मुंबईकरांसाठी पश्चिम रेल्वेचा सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प गरजेचा आहे. ही महत्त्वाची कामे असून भविष्यात  लोकल प्रवास सुकर होण्यासाठी याची मदत होणार आहे. मुंबईकरांसाठी पश्चिम रेल्वे सात कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान सोसत आहे. 
- नीरज वर्मा, मुंबई विभागीय व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे.

Web Title: Mumbaikars sattvaparikam for a week, 316 local trains of Western Railway canceled from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.