मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 05:59 IST2025-07-15T05:59:38+5:302025-07-15T05:59:46+5:30
अभ्यास गटाने शासनाला सादर केलेल्या सूचना गृहनिर्माण, सहकार, नगरविकास विभागाकडे पाठवून विभागांच्या मतावर आधारित प्रस्तावाला कॅबिनेटची मान्यता घेण्यात येईल.

मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास - समूह स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचा अहवाल सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, अहवालातील महत्त्वपूर्ण शिफारशींवर सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. त्यामुळे राज्यातील प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामांना गती मिळून मुंबईकरांच्या स्वप्नातील सुंदर व मोठ्या घरांचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल.
अभ्यास गटाने शासनाला सादर केलेल्या सूचना गृहनिर्माण, सहकार, नगरविकास विभागाकडे पाठवून विभागांच्या मतावर आधारित प्रस्तावाला कॅबिनेटची मान्यता घेण्यात येईल. आगामी डिसेंबरच्या अधिवेशनात याबाबत झालेल्या कामाचा अहवाल सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
विधानभवन येथे सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास - समूह स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचा अहवाल शासनास सादर करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, सभापती राम शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आदी उपस्थित होते.
अभ्यासगटाने केल्या शिफारशी
२०१९ मध्ये स्वयंपुनर्विकास ही संकल्पना मांडली. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संमेलनात मी स्वत: सहभागी झालो होतो. या संमेलनातील १८ मागण्या पूर्ण करून गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी शासन निर्णय काढला. यामध्ये अजून अनेक गोष्टी करण्याची गरज आहे हे लक्षात आले. त्यामुळे २४ एप्रिलला आ. प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट निर्माण केला. या गटाने अभ्यासपूर्ण शिफारशी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.