Join us

मुंबईकरांनो, आता पार्सल आणा, पण इलेक्ट्रिक वाहनातूनच; प्रदूषणाला ठेवा आता दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 10:54 IST

परिणामी व्यावसायिक वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

मुंबई : ई-कॉमर्सच्या आधुनिकीकरणामुळे लास्ट माइल डिलिव्हरी सेवांचे महत्त्व वाढले आहे. ई-कॉमर्सची भरभराट होत असताना मुंबईसारख्या शहरी भागात अशा सेवांची मागणी वाढली आहे. परिणामी व्यावसायिक वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

तथापि यामुळे वाहनांतून होणाऱ्या प्रदूषकांचे उत्सर्जन आणि वाहतूककोंडी यासारख्या आव्हानांना मुंबईकरांना सामोरे जावे लागत आहे. मात्र यावर उपाय म्हणून अशा सेवेसाठी अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने वापरली तर निश्चित प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे, असे मत मुंबईकरांनी नोंदविले आहे. मुंबईकर पर्यावरणाचा विचार करताना आता दिसत आहेत.

८८ % - तरुणांनी शेवटच्या मैलाच्या डिलिव्हरीसाठी सर्वात जास्त मोटारसायकल वापरल्याचे बघितले आहे.७१ % - तरुणांना महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणाची माहिती आहे.८४ % - तरुण भविष्यात हे धोरण स्वीकारणाऱ्या ए-कॉमर्स कंपन्यांना पसंती देतील.६९ % - डिलिव्हरी भागीदारांना इलेक्ट्रिक वाहने पुरवली तर या वाहनांचा वापर वाढेल.४४ % - आर्थिक मदत मिळाल्यास वाहनांसाठीचा प्रतिसाद वाढेल.७६%  - ए-कॉमर्स कंपन्यांनी लास्ट माइल डिलिव्हरीकरिता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा.

सर्व वाहतुकीच्या साधनांना एंड-टू-एंड आधारावर एकत्रित करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील लोकांना वाहतुकीचा त्रासमुक्त अनुभव मिळावा यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

भविष्यात शाश्वत धोरणात्मक घडामोडींसाठी युवकांचे दृष्टिकोन आणि आकांक्षा विचारात घेणे आवश्यक आहे. ई -वाहने हा एक शाश्वत वाहतुकीचा पर्याय म्हणून उदयास येत आहे.- भगवान केसभट,  संस्थापक, वातावरण

 

टॅग्स :वाहनमुंबई