मुंबई : गोरेगावमध्ये वाईन शॉप मालकाची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 15:14 IST2018-06-11T15:14:10+5:302018-06-11T15:14:10+5:30

गोरेगाव येथे वाईन शॉपचे मालक सदनीसिंग चावडा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. रविवारी रात्री उशिरा 23.20 वाजण्याच्या सुमाराची ही घटना आहे.

Mumbai: The wine shop owner shot dead in Goregaon | मुंबई : गोरेगावमध्ये वाईन शॉप मालकाची गोळ्या झाडून हत्या

मुंबई : गोरेगावमध्ये वाईन शॉप मालकाची गोळ्या झाडून हत्या

मुंबई - गोरेगाव येथे वाईन शॉपचे मालक सदनीसिंग चावडा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. रविवारी रात्री उशिरा 23.20 वाजण्याच्या सुमाराची ही घटना आहे. सदनीसिंग आणि त्यांचे सहकारी कमलेश यादव हे वीरवानी इंडस्ट्रीज येथून बॅगमधून अंदाजे दोन ते अडीच लाख रुपये घेऊन जात असताना दोन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला व त्यांनी बॅग घेऊन पळ काढला. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी चावडा यांच्या डोक्यावर गोळी लागली व ते बेशुद्ध झाले. यानंतर ट्रामा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व त्यानंतर पुढील उपचारांसाठी दाखल त्यांना कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.   याप्रकरणी हत्येच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.  

Web Title: Mumbai: The wine shop owner shot dead in Goregaon

टॅग्स :Murderखून