Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Video: वासनांध नजर, अश्लील हातवारे; मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तरुणीने लगावल्या कानशि‍लात, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 10:06 IST

Mumbai Railway Station Viral Video: मुंबईतील गोवंडी रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणीने हा व्हिडीओ शेअर करून तिच्यासोबत घडलेल्या प्रकार सांगितला.

Mumbai News: मुंबईतील गोवंडी रेल्वे स्थानकावर तरुणी बसलेली होती. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर बसलेल्या तरुण तिला एकटक बघत होता. तिच्याकडे बघतच त्याने अश्लील हावभाव करणे सुरू केले. त्यानंतर तरुणी थेट त्याच्याजवळ गेली आणि त्याला जाब विचारला आणि त्याच्या कानशि‍लात लगावल्या. त्यानंतर आजुबाजूला असलेल्या तरुणांनीही त्याला चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मुंबई लोकल, स्थानकांवर अनेकदा महिलांची छेड काढणे, विनयभंग करण्याचा घडत असतात. असाच एक प्रकार गोवंडी रेल्वे स्थानकात घडला. एका तरुणीने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात तरुणाचे कृत्ये दिसत आहेत.

अश्लील हावभाव करणाऱ्याला चोप

माहितीनुसार, गोवंडी रेल्वे स्थानकावर २३ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. तरुणी रेल्वे स्थानकावर बसलेली होती. त्याचवेळी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर एक तरुण बसलेला होता. तो एकटक तिच्याकडे बघत होता. अश्लील हावभाव करत होता. तो तिला बघून हसत होता.

तरुणी व्हिडीओ म्हणते की, हा तरुण केव्हाचा मला बघतोय. मला घाणेरडे इशारे करतोय. त्यामुळे विचार केला की, कॅमेरा सुरू करते, जेणेकरून हा शांत होईल. पण, तो तसेच करत आहे.

व्हिडीओमध्ये तो तरूण हसत हसतच उभा राहतो आणि तिला हाताने इशारा करतो. या प्रकारानंतर तरुणी त्या प्लॅटफॉर्मवर जाते आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला जाब विचारते की, इथे बसून मला काय इशारे करत होता. मी तुझा व्हिडीओ बनवला आहे. दाखवू का तुला तुझा व्हिडीओ? काय करत होता तू? कसे इशारे करत होता इथे बसून, तुला तुझा व्हिडीओ दाखवू का? असे ही तरुणी त्याला म्हणते.

त्यावर तो तरुण म्हणतो की मी काहीच केलं नाही. नंतर बोलतो की चुकून झालं. मला माफ कर. त्यानंतर तरुणी संतापते आणि त्याच्या कानाखाली लगावते. नंतर तो जाऊ लागतो. त्यावेळी त्याला पकडते. यानंतर तिथे असलेले तरुणही त्याला पकडतात आणि चोप देतात.

तरुणीचे लोकांकडून कौतुक

तरुणीने व्हिडीओ बनवून त्याला चांगलाच अद्दल घडवली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लोक तिचे कौतुक करत आहेत. अशाच मुलींची गरज असल्याचे प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त होत आहेत.

टॅग्स :व्हायरल व्हिडिओमुंबईमुंबई लोकलसोशल मीडियालैंगिक छळ