मुंबई विद्यापीठाचा ‘परफॉर्मन्स’ सुधारला; नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंगमध्ये ५६ व्या स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 07:55 IST2025-09-05T07:55:10+5:302025-09-05T07:55:10+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घसरगुंडी

Mumbai University's 'performance' improves; 56th position in National Institutional Rankings | मुंबई विद्यापीठाचा ‘परफॉर्मन्स’ सुधारला; नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंगमध्ये ५६ व्या स्थानावर

मुंबई विद्यापीठाचा ‘परफॉर्मन्स’ सुधारला; नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंगमध्ये ५६ व्या स्थानावर

मुंबई : नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाने  ६१व्या स्थानावरून ५४व्या स्थानी झेप घेतली आहे. त्याचवेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कामगिरी खालावली असून, २३व्या स्थानावरून ५६व्या स्थानी घसरण झाली आहे. 

देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या तुलनेत मुंबई विद्यापीठाची कामगिरी तीन वर्षांपासून घसरत होती. सन २०२२ मध्ये ४५व्या स्थानी, २०२३ मध्ये ५६व्या स्थानी आणि २०२४ मध्ये ६१व्या स्थानी मुंबई विद्यापीठाची घसरण झाली होती. यंदा ही घसरगुंडी थांबली. त्याचवेळी देशातील १०० सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्थांच्या यादीतही मुंबई विद्यापीठाची घसरण झाली होती. विद्यापीठ २०२० मध्ये ९५, तर २०२१ मध्ये ९६व्या स्थानी होते. त्यात काहीशी सुधारणा होऊन २०२२ मध्ये शिक्षणसंस्थांच्या यादीत ८१व्या स्थानी पोहोचले होते. 

रँकिंगमध्ये सुधारणा
आयआयटी- मुंबईने यंदाही सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्थांच्या यादीत तिसरे स्थान कायम राखले आहे. देशातील इनोव्हेशनमधील सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्थांच्या क्रमवारीत आयआयटी- मुंबईची पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तसेच नव्याने स्थापना केलेल्या आयआयएम-मुंबईने सहावे स्थान यंदाही कायम राखले आहे. 

संस्थांमधील स्पर्धांसाठी निर्णय  
देशातील उच्चशिक्षण संस्थांतील स्पर्धात्मकता वाढावी यासाठी दरवर्षी नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क जाहीर केले जाते. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२५ या वर्षाची रँकिंग जाहीर केली. 

मुंबईतील अन्य संस्थांची स्थिती
सर्वोत्कृष्ट १०० शिक्षणसंस्थांच्या रँकिंगमध्ये होमी भाभा इन्स्टिट्यूटच्या कामगिरीत २७व्या स्थानावरून २०व्या स्थानापर्यंत सुधारणा झाली आहे. 
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेचे स्थान २०२३ मध्ये ४१ होते. गेल्यावर्षी ते ५६ झाले. यंदा आणखी घसरण होऊन संस्था ६४व्या स्थानी गेली हे, तर टाटा समाजविज्ञान संस्थेला या यादीत पहिल्या १०० संस्थांमध्ये स्थान मिळाले नाही.

Web Title: Mumbai University's 'performance' improves; 56th position in National Institutional Rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.