मुंबई : इराण आणि इस्त्राईल-अमेरिका युद्धाच्या तणावातून निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे मुंबई विद्यापीठाच्या हॉस्टेलमधील खानावळीत चुलीवर जेवण बनविण्याची वेळ आली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना केवळ व्हेज बिर्याणी अथवा दालखिचडीच दिली जात आहे. त्याचबरोबर आयआयटी मुंबईच्या हॉस्टेलमधील खानावळीत विद्यार्थ्यांच्या थाळीतील खाद्यपदार्थांची संख्या कमी करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या कर्मवीर भाऊराव पाटील मुलांच्या वसतिगृहात मेसमध्ये खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी व्यावसायिक सिलिंडरचा वापर होत होता. मात्र सिलिंडर गुरुवारीच संपला. त्यामुळे चुलीवर जेवण बनविण्याची वेळ खानावळ चालकावर आली. कोळसा आणून चूल पेटवली जात आहे. चुलीवर संपूर्ण स्वयंपाक शक्य नसल्याने, तसेच मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चपाती बनविणे अवघड बनले आहे.
आयआयटी मुंबईवरही संकट; शाकाहारी थाळीच मिळणार
आयआयटी मुंबईमध्येही विद्यार्थ्यांच्या थाळीतील खाद्यपदार्थांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयआयटी मुंबईतील मेस प्रतिनिधीने विद्यार्थ्यांना शुक्रवारी याबाबतचे ई-मेल पाठविले असून शनिवारी, १४ मार्चपासून हे बदल लागू केले जाणार असल्याचे कळविले.
मांसाहारीसाठी अधिक उर्जा खर्ची पडत असल्याने शाकाहारी थाळीच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाष्ट्यामध्ये उकडलेल्या डाळी दिल्या जाणार नाहीत. तसेच दुपारी व सायंकाळच्या जेवणात केवळ एकच भाजी दिली जाईल, असे विद्यार्थ्यांना कळविण्यात आले.
Web Summary : Gas shortage due to global tensions impacts Mumbai University, IIT. University hostels resort to cooking on stoves, limiting menu options. IIT reduces food items in meals, prioritizing vegetarian options to conserve resources.
Web Summary : वैश्विक तनाव के कारण गैस की कमी से मुंबई विश्वविद्यालय, आईआईटी प्रभावित। विश्वविद्यालय के छात्रावासों में चूल्हे पर खाना बनाना, मेनू विकल्प सीमित। आईआईटी संसाधनों को बचाने के लिए भोजन में खाद्य पदार्थ कम करता है, शाकाहारी विकल्पों को प्राथमिकता देता है।