लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थाच्या यादीत मुंबई विद्यापीठाला स्थान मिळाले आहे. विद्यापीठाने या यादीत १७ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे, तर आयआयटी-मुंबईची घसरण झाली असून, ते दुसऱ्या स्थानी गेले आहे. आयआयटी-दिल्लीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
करेली सायमंड (क्यूएस) यांनी क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ जाहीर केली आहे. यात जगभरासह देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्था आणि विद्यापीठांची यादी आहे. जगभरातील शिक्षण संस्थांमध्ये मागील वर्षी मुंबई विद्यापीठ ७११- ७२० च्या क्रमवारीत होते. यंदा मुंबई विद्यापीठाने ६६४ व्या स्थानी झेप घेतली आहे, तर राज्यातील पारंपरिक विद्यापीठाच्या यादीत द्वितीय स्थान पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर्नल्समध्ये मुंबई विद्यापीठाच्या संशोधन पेपर्सची १५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यापीठाशी सलंग्नित असलेले ८० हून अधिक प्राध्यापक व्यावसायिक कार्यकारणींवर कार्यरत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
या रँकींगमध्ये सुधारणाक्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रैंकिंगच्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करत एम्प्लॉयमेंट आऊटकममध्ये सर्वाधिक ९५ गुण प्राप्त केले आहेत. त्यापाठोपाठ सायटेशन पर फॅकल्टी वर्गवारीत ५३.७, सस्टेनॅबिलिटी ४१.३, एम्प्लॉयर रेप्युटेशन ३१.५, इंटरनॅशनल रिसर्च नेटवर्क २७.६, त्याचबरोबर एकेडमिक रेप्युटेशन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी प्रमाण आणि फॅकल्टी स्टूडेंट्स रेशोमध्येही विद्यापीठाने उत्तम कामगिरी केली आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू काय म्हणाले?"विद्यापीठातील सर्व घटकांनी संशोधन आणि विकासाच्या प्रक्रियेत केलेल्या विशेष आणि साश्वत प्रयत्नांची ही फलनिश्पती आहे. रँकिंगमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी विद्यापीठाने युडीआरएफसारखे अभिनव प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण, शाश्वत विकास आणि प्राध्यापक भरती यामुळे भविष्यात रँकिंगमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील", असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी म्हणाले.
आयआयटी-दिल्लीची बाजीक्यूस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकींगमध्ये जगातील शिक्षण संस्थांमध्ये आयआयटी मुंबईची ११८ व्या स्थानावरून १२९ व्या स्थानी घसरण झाली आहे. आयआयटी दिल्लीने यंदा चमकदार कामगिरी करत १५० व्या स्थानावरून १२३ व्या स्थानी झेप घेतली आहे. आयआयटी मद्रास देशात तिसऱ्या स्थानी राहिले आहे.