Mumbai: लोकलमध्ये तरुणीला एकटं पाहून अज्ञात व्यक्तीचं घाणेरडं कृत्य, व्हिडीओ पाहून संतापले लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 21:15 IST2025-05-15T21:09:50+5:302025-05-15T21:15:29+5:30

Unidentified Man Harasses College Girl: दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने महिलांच्या सुरक्षतेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

Mumbai: Unidentified Man Harasses 19-Year-Old College Girl On Goregaon Western Railway Local | Mumbai: लोकलमध्ये तरुणीला एकटं पाहून अज्ञात व्यक्तीचं घाणेरडं कृत्य, व्हिडीओ पाहून संतापले लोक!

Mumbai: लोकलमध्ये तरुणीला एकटं पाहून अज्ञात व्यक्तीचं घाणेरडं कृत्य, व्हिडीओ पाहून संतापले लोक!

मुंबईतील गोरेगाव रेल्वे स्थानकावर लोकमध्ये बसलेल्या महाविद्यालयीन तरुणीसोबत एका अज्ञात व्यक्तीचे गैरवर्तन केले.  बोरिवली रेल्वे पोलिसांनी संबंधित तरुणीचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने महिलांच्या सुरक्षतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.  

पीडित तरुणी गोरेगावची रहिवासी असून विलेपार्ले येथील महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास गोरेगाव रेल्वेस्थानकात लोकलमध्ये चढली. त्यानंतर एक माणूस तिच्याजवळ आला आणि तिच्यावर अश्लील कमेंट करू लागला. तरुणी घाबरली आणि खिडकीपासून दूर गेली. मात्र, तरीही तो व्यक्ती अश्लील हावभाव करत राहिला. त्यानंतर तरुणीने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हे पाहून त्या व्यक्तीने पळ काढला.

पीडिताच्या मैत्रीणीने सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला. या पोस्टमध्ये तरुणीच्या मैत्रिणीने महिलांच्या सुरक्षणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. "जर हा विकृत माणूस डब्यात शिरला असता तर काय झाले असते? अशा घटना दररोज घडत असतात. माझी मैत्रिण दररोज याच वेळी महाविद्यालयात जाते. दिवसाढवळ्या घडू शकतात तर, पुढे काय होईल याची आपण फक्त कल्पना करू शकतो", असे तिने म्हटले आहे. बोरिवली रेल्वे पोलिसांनी सांगितले की त्यांनी सोशल मीडिया पोस्टवरून घटनेची नोंद घेतली. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

Web Title: Mumbai: Unidentified Man Harasses 19-Year-Old College Girl On Goregaon Western Railway Local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.