Join us

मुंबई : गोरेगावमध्ये आकाशकंदीलचा शॉक लागून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 19:19 IST

मुंबई - आकाशकंदीलचा शॉक लागल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शुक्रवारी (20 ऑक्टोबर) रात्री ही घटना घडली असून याप्रकरणी वनराई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे व अधिक चौकशी सुरू आहे.

प्रियांका भारती (वय 27 वर्ष ) आणि प्रिन्स (वय 6 वर्ष) असे या मृत पावलेल्या आई व मुलाचे नाव आहे. भारती या गृहिणी होत्या.  गोरेगाव पूर्वच्या बीबीसारनगर येथील म्हाडा कॉलनीमध्ये पती आणि सहा वर्षांच्या मुलीसह त्या राहत होत्या. त्यांचे पती खासगी कंपनीत कार्यरत आहेत.

शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्या फ्लॅटच्या गॅलरीमध्ये प्रिन्सला घेऊन बसल्या होत्या. त्यांची मोठी मुलगी टीव्ही पाहत बसली होती. तर पती कामावर गेले होते.  ज्या गॅलरीत प्रियांका बसल्या होत्या तेथेच आकाशकंदील लावण्यात आला होता.  अचानक या कंदीलमधून विद्युतप्रवाह वाहून संपूर्ण ग्रीलद्वारे वीजेचा शॉक बसू लागला. दुर्दैवानं भारती नेमक्या ग्रीलवरच बसल्या होत्या.  काही कळण्याच्या आतच विजेचा जोरदार झटका प्रियांका आणि  त्यांचा मुलगा प्रिन्सला बसला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :अपघात