मुंबईत ९२ हजार ९८८ कोरोनाबाधित, २२ हजार ५४० रुग्णांवर उपचार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 10:12 PM2020-07-12T22:12:34+5:302020-07-12T22:14:31+5:30

५ ते ११ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.३९ टक्के आहे. तर ११ जुलैपर्यंत मुंबईत कोविडच्या ३ लाख ९१ हजार २२२ चाचण्या झाल्या आहेत.

In Mumbai, treatment was started on 92 thousand 988 coronary arthritis and 22 thousand 540 patients | मुंबईत ९२ हजार ९८८ कोरोनाबाधित, २२ हजार ५४० रुग्णांवर उपचार सुरु

मुंबईत ९२ हजार ९८८ कोरोनाबाधित, २२ हजार ५४० रुग्णांवर उपचार सुरु

Next
ठळक मुद्दे५ ते ११ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.३९ टक्के आहे. तर ११ जुलैपर्यंत मुंबईत कोविडच्या ३ लाख ९१ हजार २२२ चाचण्या झाल्या आहेत.पालिकेच्या आरोग्य विभागाने आतापर्यंत ३४ लाख ६४ हजार २८ घरांना तपासणीकरिता भेट दिली

मुंबई - मुंबईत रविवारी १ हजार २४३ रुग्ण , तर ४४ मृत्यूंची नोंद झाली. मुंबईत कोरोन बाधितांची एकूण संख्या ९२ हजार ९८८ असून बळींचा आकडा ५ हजार २८८ झाला आहे. सध्या मुंबईत २२ हजार ५४० रुग्ण उपचार घेत आहेत. शहर उपनगरात बरे झालेल्या रुग्णांचा दर ७० टक्क्यांवर पोहोचला आहे, तर रुग्ण दुपटीचा दर ५० दिवसांवर आहे.

५ ते ११ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.३९ टक्के आहे. तर ११ जुलैपर्यंत मुंबईत कोविडच्या ३ लाख ९१ हजार २२२ चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ४४ मृत्यूंमध्ये ३२ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. ३२ जणांचे वय ६० वर्षांहून अधिक होते. उर्वरित ८ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील आहेत. मुंबई दिवसभरात १ हजार ४४१ रुग्ण बरे झाले आहेत,तर आतापर्यंत ६४ हजार ८७२ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

पालिकेच्या आरोग्य विभागाने आतापर्यंत ३४ लाख ६४ हजार २८ घरांना तपासणीकरिता भेट दिली. यात ५ लाक ७५ हजार ४७६ ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरातील आॅक्सिजनची पातळी तपासण्यात आली. त्यातील २ हजार ४३७ ज्येष्ठ नागरिकांची आॅक्सिजनची पातळी कमी असल्याचे निदर्शनास आले , त्या नागरिकांना पुढील उपचारांसाठी संदर्भित कऱण्यात आले आहे.

Web Title: In Mumbai, treatment was started on 92 thousand 988 coronary arthritis and 22 thousand 540 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.