Mumbai Train Update : मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 14:36 IST2019-05-28T13:57:50+5:302019-05-28T14:36:30+5:30

मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी (28 मे) विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. तब्बल 45 मिनिटे वाहतूक उशिराने सुरू आहे.

Mumbai Train Update central railway traffic disrupted | Mumbai Train Update : मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प

Mumbai Train Update : मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प

मुंबई - मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी (28 मे) विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. तब्बल 45 मिनिटे वाहतूक उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये सध्या प्रचंड गर्दी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण, डोंबिवलीहून दररोज हजारो प्रवासी सीएसएमटीच्या दिशेने प्रवास करतात. जवळपास 45 मिनिटे लोकल उशिराने सुरू आहे. सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल सेवेला फटका बसला आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला होता. 


मध्य रेल्वे मार्गावर 79 पंप उपसणार पावसाचे पाणी! पाणी साचू नये म्हणून उपाययोजना सुरू

दरवर्षी थोडा पाऊस पडला तरी रेल्वे रुळावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. दरवर्षीच्या या रडगाण्याची यंदा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मान्सूनची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील स्थानकांत एकूण 79 पंप मशीन बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मध्य रेल्वे मार्गावर पाणी तुंबण्याची समस्या होते. सहा ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी तुंबते. या भागातून पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप मशीनच्या संख्येत वाढ केली आहे, अशी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात मोठा पाऊस पडल्यास रेल्वेचा वेग मंदावतो. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडून जाते. परिणामी, प्रवाशांना पायपीट करत इच्छितस्थळी पोहोचावे लागते. वादळवारा आणि पाऊस पडल्यामुळे झाडे पडण्याच्या घटना, सिग्नल बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे अशा घटना घडतात. त्यामुळे मान्सूनपूर्व काळात रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, नालेसफाई, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करणे, रेल्वे रुळांची स्वच्छता करणे, रेल्वे मार्गात येणाºया लोखंडी वस्तूंना गंजरोधक रंग लावणे अशी कामे सध्या सुरू आहेत. एप्रिलपासून सुरू केलेली कामे मे अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वे प्रशासनाने ठेवले असून आतापर्यंत 70 ते 80 टक्के कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

Web Title: Mumbai Train Update central railway traffic disrupted