Mumbai Crime: श्रीमंती आणि टोकाच्या व्यसनाधीनतेतून एक हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची घटना वडाला परिसरात घडली आहे. हैदर कराचीवाला (२१) या तरुणाने आपल्या राहत्या घराच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. दारूच्या व्यसनामुळे पालकांशी झालेल्या वादातून हे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
वडाला टीटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदर कराचीवाला याला दारूचे प्रचंड व्यसन होते. त्याच्या या सवयीमुळे घरात वारंवार भांडणे होत असत. रविवारी पहाटे हैदरचे त्याच्या आई-वडिलांशी पुन्हा याच कारणावरून जोरदार भांडण झाले. त्यानंतर तो रागाच्या भरात घर सोडून निघून गेला होता.
पोलिसांनी पालकांना बोलावले
पहाटे ४ च्या सुमारास हैदर विलेपार्ले परिसरात नशेत धुंद अवस्थेत पोलिसांना आढळला. विलेपार्ले पोलिसांनी त्याचे वडील युसूफ कराचीवाला यांना फोन करून माहिती दिली आणि मुलाला घरी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर वडील पहाटे ६ वाजता हैदरला घरी घेऊन आले.
२१ व्या मजल्यावरून थेट मारली उडी
घरी आल्यानंतर पालकांनी हैदरला धर्मामध्ये दारू निषिद्ध असल्याचे सांगून हे व्यसन सोडण्यासाठी प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हैदर शांतपणे आपल्या खोलीत निघून गेला. मात्र, सकाळी ८:१५ च्या सुमारास अचानक त्याने आपल्या खोलीच्या खिडकीतून २१ व्या मजल्यावरून खाली झेप घेतली. मोठा आवाज झाल्याने वडिलांनी तिथे धाव घेतली, तेव्हा त्यांना आपला मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले.
रुग्णालयात मृत घोषित
घटनेनंतर तातडीने पोलिसांच्या मदतीने हैदरला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वडाला टीटी पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : A 21-year-old Mumbai man, addicted to alcohol, tragically jumped from his 21st-floor apartment after a dispute with his parents about his addiction. He was brought home drunk by his father hours before the suicide.
Web Summary : मुंबई में शराब की लत से परेशान 21 वर्षीय युवक ने माता-पिता से विवाद के बाद अपने 21वीं मंजिल के अपार्टमेंट से कूदकर आत्महत्या कर ली। पिता उसे नशे की हालत में घर लाए थे।