वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 09:02 IST2018-09-11T08:25:45+5:302018-09-11T09:02:04+5:30
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक बंद पडल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी
मुंबई - वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक बंद पडल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गोरेगावजवळ आरे उड्डाणपुलावर ट्रक बंद पडल्याची घटना घडली. सकाळपासूनच वाहतुकीचा खोळंबा झाल्याने अंधेरीच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. हायवेवर वाहनांच्या रांगा लागल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबई - वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर गोरेगावजवळ आरे उड्डाणपुलावर ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी, अंधेरीच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम #Mumbai#Traffic
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) September 11, 2018