घरमालक आणि भाडेकरू यांच्यात वाद झाला. त्यानंतर भाडेकरूने घरमालकाला कारखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना देवनार भागात २१ जुलै रोजी घडली. जखमी घरमालाकाने २३ जुलै रोजी पोलिसांकडे याबद्दलची तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भाडेकरू आणि घरमालक देवनार भागात राहतात. घरमालक भाडेकरूकडे घरभाडे मागण्यासाठी गेला होता. घरमालकाने घरभाडे मागितले. पण, भाडेकरू आणि घरमालक यांच्यात घरभाडे देण्यावरून वाद झाला.
वाद विकोपाला गेल्यानंतर भाडेकरून थेट कारच घरमालकाच्या अंगावर घातली. घरमालकाला कारखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न भाडेकरून केला, पण घरमालक वाचला. या घटनेत घरमालक जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
२१ जुलै रोजी झालेल्या घटनेप्रकरणी २३ जुलै रोजी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी भाडेकरूला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.