मुंबई :मेघवाडीत पोलिसाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 04:06 IST2018-02-28T04:06:33+5:302018-02-28T04:06:33+5:30

मेघवाडी परिसरात पोलिसाच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. भूषण वाघ (२७) असे मृत मुलाचे नाव आहे.

Mumbai: Suicide by taking robbery in a police station in Meghwadi | मुंबई :मेघवाडीत पोलिसाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई :मेघवाडीत पोलिसाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई : मेघवाडी परिसरात पोलिसाच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. भूषण वाघ (२७) असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे.
जोगेश्वरीच्या पोलीस वसाहतीत भूषण हा कुटुंबीयांसह राहायचा. २ वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याला ६ महिन्यांची मुलगी आहे. मंगळवारी दुपारी राहत्या घरी त्याने गळफास घेत आयुष्य संपविले. घरी आलेल्या नातेवाइकांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. भूषणचे वडील राजेश रतीलाल वाघ हे जोगेश्वरी पोलीस ठाण्यात हवालदार आहेत. भूषणची पत्नी गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यासोबत राहात नव्हती. त्या दोघांमध्ये काही कारणामुळे वाद सुरू होते. या वादामुळे ती माहेरी निघून गेली होती. भूषणने याच तणावातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: Mumbai: Suicide by taking robbery in a police station in Meghwadi