मुंबई उपनगरवासीयांना घरबसल्या व्हाॅट्सअपद्वारे दाखले! प्रक्रिया होणार आणखी सुलभ

By मनोहर कुंभेजकर | Updated: October 3, 2025 14:09 IST2025-10-03T14:08:38+5:302025-10-03T14:09:53+5:30

अंधेरीच्या तहसीलदार स्नेहलता स्वामी यांनी पुढाकार घेऊन हे काम राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर पूर्ण केले आहे.

Mumbai suburban residents can get certificates through WhatsApp from home! The process will be even easier | मुंबई उपनगरवासीयांना घरबसल्या व्हाॅट्सअपद्वारे दाखले! प्रक्रिया होणार आणखी सुलभ

मुंबई उपनगरवासीयांना घरबसल्या व्हाॅट्सअपद्वारे दाखले! प्रक्रिया होणार आणखी सुलभ

मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क


मुंबई : मुंबई उपनगरातील नागरिकांना आता माेबाइल व्हाॅट्सॲपद्वारे दाखले उपलब्ध हाेणार आहेत. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकाभिमुख गतिमान प्रशासन करण्याच्या अनुषंगाने अनेक बदल महसूल प्रशासनाकडून अंमलबजावणी सुरू आहे़.

अंधेरीच्यातहसीलदार स्नेहलता स्वामी यांनी पुढाकार घेऊन हे काम राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर पूर्ण केले आहे, तर आता बोरिवली आणि कुर्ला अन्य दोन्ही तालुक्यांत याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पीडीएफ फाइल व्हाॅट्सॲपद्वारे मिळाल्याने प्रिंट काढण्यासाठी लागणारा कागद वाचला व हवे तेव्हा अर्जदार आवश्यक ठिकाणी तो मूळ दाखला अपलोड करू शकतो. त्यामुळे ग्रीन ऑफिसकडे जाणारा हा प्रवास पर्यावरणास पूरक झाला आहे.

मी तहसील कार्यालयात माझे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. ज्या दिवशी अर्ज केला त्याचदिवशी मला व्हाॅट्सअप संदेशाद्वारे माझा दाखला मिळाला. हे गतिमान प्रशासन पाहून मी भारावून गेलो आपले सरकार आपला दाखला थेट आपल्या हातात, हा माझ्यासाठी एक सुखद अनुभव होता़ या जनहिताच्या उपक्रमास मी खूप शुभेच्छा देतो.
दिलीप सेन, संगीत दिग्दर्शक, अंधेरी

मला माझा जेष्ठ नागरिक दाखला व्हाॅट्सअप संदेशाद्वारे मिळाला, खूप छान वाटले. जेष्ठ नागरिकांसाठी ही फार उपयुक्त सुविधा असून अंधेरी तहसील कार्यालयाने ती सुरू केली़ याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.
दीपक पराशर, ज्येष्ठ सिनेअभिनेता, वर्सोवा

माझे रहिवासी प्रमाणपत्र मला व्हाॅट्सअपद्वारे मिळाले. त्यामुळे माझा वेळ वाचला आणि पीडीएफ कधीही वापरता येईल, या पद्धतीने मी सुरक्षित संग्रहित ठेवली आहे. येथील प्रशासनाचे आभार, हा उपक्रम खूप छान आहे.
प्रियांका मायणगाडे, विद्यार्थीनी

Web Title: Mumbai suburban residents can get certificates through WhatsApp from home! The process will be even easier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.