मुंबई : मुंबईत कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला असला तरी नव्या वर्षातच सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू हाेणार आहे. मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने तूर्तास लाेकल सुरू करणे योग्य नसल्याचे सांगितले. गणेशोत्सव, दहीहंडी किंवा त्यापूर्वीचे सण असोत, आपण काळजी घेतली आहे. तशीच यापुढेही नाताळ असो किंवा कुठलाही अन्य उत्सव, नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जाईल व त्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबतचा विचार केला जाईल, असे चहल यांनी म्हटले आहे.
सर्वसामान्यांसाठी लोकल नव्या वर्षातच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 06:51 IST