Join us
Daily Top 2Weekly Top 5

Viral VIdeo: धक्कादायक! सिगारेटचे पैसे मागितल्यानं कारचालक भडकला; विक्रेत्याला १०० मीटर फरफटत नेलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 14:19 IST

Mumbai Oshiwara Shocking Video: मुंबईच्या ओशिवारा परिसरातून काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे.

मुंबईच्या ओशिवारा परिसरातून काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. केवळ ८७० रुपयांच्या किरकोळ वादातून एका सिगारेट विक्रेत्याला कारने तब्बल १०० मीटरपर्यंत फरफटत नेल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ओशिवारा परिसरात आज पहाटेच्या सुमारास एका कारमधून आलेल्या काही तरुण-तरुणींच्या गटाने सिगारेट खरेदी केली. जेव्हा विक्रेत्याने या सिगारेटचे ८७० रुपये मागितले, तेव्हा या गटाने पैसे देण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात जोरदार बाचाबाची सुरू झाली. वाद इतका विकोपाला गेला की, कारमधील एका महिलेने विक्रेत्याची कॉलर पकडून त्याला ओढले, तर कारमधील इतर व्यक्तींनी खिडकीतूनच त्याच्यावर हल्ला चढवला. परिस्थिती एवढ्यावरच थांबली नाही, पैसे न देता पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कारचालकाने गाडीचा वेग वाढवला आणि खिडकीला लटकलेल्या अवस्थेत असलेल्या विक्रेत्याला सुमारे १०० मीटरपर्यंत रस्त्यावरून फरफटत नेले.

व्हायरल व्हिडीओ: पालकांनो, मुलांच्या हातात मोबाईल देताय? 'हा' व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

एकाला अटक, इतरांचा शोध सुरू

या घटनेची माहिती मिळताच ओशिवारा पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास चक्रे फिरवून एका आरोपीला अटक केली आहे. या हल्ल्यात सामील असलेल्या इतर संशयितांचा शोध अद्याप सुरू आहे. जखमी विक्रेत्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

व्हायरल व्हिडीओ: आता पॉपकॉर्न खाण्याआधी १०० वेळा विचार कराल, विक्रेत्याचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद!

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

ओशिवारा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना कुठेही घडत असल्यास त्याची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी. "आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणाचीही गय केली जाणार नाही," असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Driver Drags Cigarette Vendor Over Unpaid Bill; Arrest Made

Web Summary : In Mumbai's Oshiwara, a cigarette vendor was dragged 100 meters by a car after demanding 870 rupees. One person is arrested; police are searching for others involved in the assault. The victim is hospitalized.
टॅग्स :व्हायरल व्हिडिओमुंबईसोशल व्हायरल