Join us

'मुंबई आपल्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची', राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 18:01 IST

Shiva Sena Vs Navneet Rana & Ravi Rana: संध्याकाळी राणा दाम्पत्याला ताब्यात घेत पोलिसांनी त्यांना खार पोली ठाण्यामध्ये नेले. दरम्यान, राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंत शिवसेनेने जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

मुंबई - मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पढण्याचे आव्हान देणाऱ्या रवी राणा आणि नवनीत राणांविरोधात दिवसभर शिवसैनिक आक्रमक झालेले दिसले. दरम्यान, संध्याकाळी राणा दाम्पत्याला ताब्यात घेत पोलिसांनी त्यांना खार पोली ठाण्यामध्ये नेले. दरम्यान, राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंत शिवसेनेने जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

रवी राणा आण नवनीत राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर युवासेना नेते वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या निवासस्थानासमोर जोरदार घोषणाबाजी केली. राणा दाम्पत्य घाबरले आणि पोलिसांसोबत पळून गेले. मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पढण्याचे आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याला घराबाहेरही पाऊल टाकता आले नाही, अशा शब्दात वरुण सरदेसाई यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांची खिल्ली उडवली.

तसेच यावेळी वरण सरदेसाई यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. मुंबई आपल्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची, उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात आल्या.  

टॅग्स :रवी राणानवनीत कौर राणाशिवसेनावरुण सरदेसाई