Join us  

राज ठाकरेंच्या भेटीनंतर अमोल कोल्हे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 3:22 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि शिरुरचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली.

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते आणि शिरुरचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. डॉ. अमोल कोल्हे आणि राज ठाकरेंच्या भेटीनं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर या भेटीनंतर डॉ. अमोल कोल्हेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या. त्यांच्या सभांचा सकारात्मक परिणाम झाला. त्यामुळेच मी राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी कृष्णकुंजवर आलो होतो. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही डॉ. अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात 'नरेंद्र मोदींना पाडा' असा जणू विडाच उचलला होता. राज्यभरात ठिकठिकाणी जाहीर सभा घेऊन त्यांनी, मोदी-शहा जोडीला राजकीय क्षितीजावरून हटवण्याचं आवाहन केलं होतं. पंतप्रधान मोदी आणि  भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना देशाच्या राजकीय क्षितिजावरुन हटवा, असं आवाहन राज यांनी केलं होतं. त्यासाठी त्यांनी नांदेड, सोलापूर, सांगली, पुणे, रायगड, शिवडी, भांडूप, शिरुर, नाशिकमध्ये सभा घेतल्या होत्या. मात्र यातील बहुतांश ठिकाणी युतीचे उमेदवार विजयी झाले. राज ठाकरेंच्या सभेचा काँग्रेस, राष्ट्रवादीला फायदा होईल, असा अंदाज बांधला जात होता.  मात्र राज यांच्या सभांचा फारसा फायदा  आघाडीला झाला नाही. 

टॅग्स :राज ठाकरेडॉ अमोल कोल्हे