जगातील सर्वोत्तम फूड मिळणाऱ्या शहरांमध्ये मुंबईचा नंबर घसरला! असं कसं झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 16:40 IST2025-03-13T16:39:14+5:302025-03-13T16:40:51+5:30

Mumbai Best Food City In The World: भारताची खाद्यसंस्कृती वैविध्यपूर्ण आणि व्यापक आहे. इथे नाक्या-नाक्यावर एखादा हटके पदार्थ चाखायला मिळतो आणि त्याची थेट जगही दखल घेते.

Mumbai Ranked 14th Best Food City In The World | जगातील सर्वोत्तम फूड मिळणाऱ्या शहरांमध्ये मुंबईचा नंबर घसरला! असं कसं झालं?

जगातील सर्वोत्तम फूड मिळणाऱ्या शहरांमध्ये मुंबईचा नंबर घसरला! असं कसं झालं?

मुंबई

भारताची खाद्यसंस्कृती वैविध्यपूर्ण आणि व्यापक आहे. इथे नाक्या-नाक्यावर एखादा हटके पदार्थ चाखायला मिळतो आणि त्याची थेट जगही दखल घेते. भारतीय खाद्यसंस्कृतीची दखल वेळोवेळी जगानेही घेतली आहे. नुकतंच टाइम आऊटने (Time Out) जारी केलेल्या जगातील सर्वोत्तम फूड मिळणाऱ्या (Best Food City In The World) टॉप-२० शहरांमध्ये यंदाही मुंबईने स्थान पटकावले आहे. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईचा नंबर घसरला आहे. जगातील सर्वोत्तम फूड मिळणाऱ्या शहरांच्या यादीत यंदा मुंबईला १४ वे स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी मुंबईचा क्रमांक ८ वा होता. 

फूड, लाइफस्टाइल आणि एन्टरटेन्मेंट गाइड म्हणून ओळख असलेल्या टाइम आऊटने जगातील टॉप-२० शहरांची यादी जाहीर केली. यात मुंबईचा समावेश करताना टाइम आऊटने मुंबईतील स्ट्रीट फूड अर्थात खाऊ गल्ल्यांचा विशेष उल्लेख केला आहे. "भूक लागल्यावर झटपट मिळणाऱ्या पदार्थांसाठी दक्षिण मुंबईतील झवेरी बाजार असो ते अगदी उत्तर मुंबईतील घाटकोपर पर्यंतच्या परिसरात खाऊ गल्ली खूप प्रसिद्ध आहेत. चविष्ट चाट, जंबो-सँडविच ते 'पिझ्झा', फ्रँकी-रॅप्स आणि ड्राय-फ्रूट फालुदापर्यंत सर्व पदार्थ मुंबईत स्ट्रीट फूडमध्ये हमखास मिळतात", असे टाइम आऊटने नमूद केले आहे. 

जागतिक क्रमावारीत न्यू ऑर्लीन्स (यूएसए), बँकॉक (थायलंड) आणि मेडेलिन (कोलंबिया) या शहरांनी अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे. 

खाद्यपदार्थांच्या बाबतीत टॉप-२० शहरांची यादी पुढीलप्रमाणे...
१. न्यू ऑर्लीन्स, अमेरिका
२. बँकॉक, थायलंड
३. मेडेलिन, कोलंबिया
४. केपटाऊन, दक्षिण आफ्रिका
५. माद्रिद, स्पेन
६. मेक्सिको सिटी, मेक्सिको
७. लागोस, नायजेरिया
८. शांघाय, चीन
९. पॅरिस, फ्रान्स
१०. टोकियो, जपान
११. माराकेश, मोरोक्को
१२. लिमा, पेरू
१३. रियाध, सौदी अरेबिया
१४. मुंबई, भारत
१५. अबु धाबी, संयुक्त अरब अमिराती
१६. कैरो, इजिप्त
१७. पोर्तो, पोर्तुगाल
१८. मॉन्ट्रियल, कॅनडा
१९. नेपल्स, इटली
२०. सॅन होजे, कोस्टा रिका 

यादी कशी तयार केली गेली?
टाईम आउटच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ही यादी तयार करण्यासाठी जगभरातील हजारो लोकांचे सर्वेक्षण केले. स्थानिकांना त्यांच्या शहरातील खाद्यपदार्थांचे मूल्यांकन १८ वेगवेगळ्या निकषांवर करण्यास सांगितले होते, ज्यात गुणवत्ता, परवडणारे दर आणि कुटुंबातील प्रत्येकाला आवडणारे ते अगदी प्रायोगिक तत्वापर्यंतचे पदार्थ अशा पातळीवरचे निषक ठेवण्यात आले होते. या रेटिंग्ज तसेच प्रकाशनाच्या अंतर्गत अन्न तज्ञ आणि समीक्षकांच्या गुणांच्या आधारे एक रँकिंग तयार करण्यात आली.

Web Title: Mumbai Ranked 14th Best Food City In The World

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.