Join us  

Mumbai Rain: मुंबईच्या तलाव क्षेत्रात पाऊस दिवसभर बरसला, एवढा की महिन्याभराचा जलसाठा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 7:46 PM

२४ तासांत एक लाख २८ हजार दशलक्ष लिटरची भर. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पंधरवड्यातही पावसाने निराशा केली. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांमध्ये १५ जुलैपर्यंत केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक होता.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - मागील तीन ते चार दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेले दोन दिवस तलाव क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे २४ तासांच्या कालावधीत सर्व प्रमुख तलावांमध्ये मिळून एकूण एक लाख २८ हजार दशलक्ष लिटर जलसाठा वाढला आहे. तब्बल महिनभर पुरेल इतका हा जलसाठा असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Heavy Raining in one day increased Water storage of mumbai.)

जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पंधरवड्यातही पावसाने निराशा केली. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांमध्ये १५ जुलैपर्यंत केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक होता. मुंबईत पावसाला सुरुवात झाल्यानंतरही पावसाळी ढग ठाणे जिल्ह्यातील तलाव क्षेत्राकडे फिरकले नव्हते. त्यामुळे पाणीकपातीचे संकट ओढावले होते.

दरम्यान, शनिवारपासून तलाव क्षेत्रातही पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. रविवारीही दिवसभर पाऊस कोसळत राहिल्याने मुंबईतील तुळशी आणि विहार तलाव भरली. तर मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, अप्पर वैतरणा या तलावांमध्येही पावसाने खातं उघडलं. त्यामुळे सोमवार सकाळपर्यंत सर्व तलाव क्षेत्रात मिळून एकूण चार लाख १५ हजार दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला आहे.

महापालिकेमार्फत दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक असते. 

१९ जुलै २०२१ रोजी

जलसाठ्याची आकडेवारी( मीटर्समध्ये )

तलाव..कमाल.. किमान ...उपायुक्त साठा (दशलक्ष)  सध्या

मोडक सागर १६३.१५   १४३. २६       ६६०९२  १५४.९६

तानसा    १२८.६३      ११८.८७      ७८४६७    १२४.८५

विहार    ८०.१२        ७३.९२        २७६९८.....८०.५६

तुळशी    १३९.१७        १३१.०७       ८०४६    ..१३९.४८

अप्पर वैतरणा ६०३.५१    ५९७.०२    ०००...५९२.७५

भातसा    १४२.०७        १०४.९०      १९७३२१ ...११८.५०

मध्य वैतरणा २८५.००    २२०.००   ३७५५१   ..२४९.९०

 

वर्ष.....जलसाठा (दशलक्ष लिटर)...टक्के

२०२१ -  ४१५१७५

२०२० - ३९१२९०

२०१८- ७४३५३१

टॅग्स :मुंबईपाणीमुंबई मान्सून अपडेट