मुंबई-पुणे हायपरलूपला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 06:09 AM2018-06-17T06:09:45+5:302018-06-17T06:10:14+5:30

मुंबई-पुणे या मार्गावर हायपरलूप या तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दृष्टीने चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हर्जिन हायपरलूपच्या अमेरिकेतील चाचणी केंद्रास भेट देऊन पाहणीदेखील केली.

Mumbai-Pune Hydroloop Speed | मुंबई-पुणे हायपरलूपला गती

मुंबई-पुणे हायपरलूपला गती

Next

मुंबई : मुंबई-पुणे या मार्गावर हायपरलूप या तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दृष्टीने चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हर्जिन हायपरलूपच्या अमेरिकेतील चाचणी केंद्रास भेट देऊन पाहणीदेखील केली. तसेच मुंबईत अत्याधुनिक डाटा सेंटर्स उभारण्यासह नागरिकांना शासकीय सेवा अधिक गतीने देता याव्यात यासाठीही ओरॅकल ही आघाडीची कंपनी राज्य शासनासोबत काम करणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नेवाडा येथे व्हर्जिन हायपरलूप तंत्रज्ञानाच्या चाचणी केंद्रास भेट दिली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक रॉब लॉईड यांनी मुख्यमंत्र्यांना संपूर्ण माहिती दिली. मुंबई-पुणे या मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाची व्यावहारिक उपयोगिता पडताळण्यासाठी नुकताच एक अभ्यासही करण्यात आला आहे.
आजच्या चर्चेनुसार, व्हर्जिन हायपरलूप लवकरच त्यांच्या अभियंत्यांचे पथक पुण्याला पाठविणार आहे. या प्रकल्पासाठी पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यात १५ किलोमीटरचा प्रायोगिक मार्ग (ट्रॅक) निश्चित केला आहे. मुंबई-पुणे अंतर हायपरलूपने २० मिनिटात कापता येईल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओरॅकलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कात्झ यांचीदेखील सॅन फ्रॅन्सिस्को येथे भेट घेतली. मुंबईमध्ये अत्याधुनिक डाटा सेंटर्स सुरूकरण्याची ओरॅकलची तयारी आहे. त्यासाठी आवश्यक गुंतवणूक प्रस्तावांवरील कार्यवाहीस राज्य शासन गती देईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर शासकीय माहितीच्या संदर्भात करण्यासाठी एक संयुक्त गट स्थापन करण्याबाबतसुद्धा सहमती झाली. सोबतच आर्टिफिशियल इंटिलिजन्स, फिनटेक, क्लाऊड कम्प्युटिंग या बाबतही चर्चा झाली.
नागरिकांना आपल्या कामांसाठी अनेक प्रकारची माहिती घेऊन विविध शासकीय विभागांकडे सातत्याने जावे लागते. त्यापासून त्यांना दिलासा देण्यासाठी एक विशिष्ट प्रणाली विकसित करण्यासंदर्भातदेखील राज्य सरकार ओरॅकलसोबत काम
करणार आहे.
>सायबर सुरक्षेसंदर्भात सिमॅन्टेकशी करार
फडणवीस यांनी सिमॅन्टेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग क्लार्क यांचीही सॅनफ्रॅन्सिस्को येथे भेट घेतली. राज्य सरकारचा माहिती-तंत्रज्ञान विभाग आणि सिमॅन्टेक यांच्यात सायबर सुरक्षेसंदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. सायबर पोलिसिंग संदर्भात सिमॅन्टेक आणि गृहविभाग यांच्यात संयुक्त कृतीदल स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या माध्यमातून यापूर्वीच स्थापन केलेल्या सायबर लॅबची क्षमता वृद्धी आणि विकास साध्य होणार आहे.
>फ्रेंड्स आॅफ बीजेपीशी संवाद
ओव्हरसिज फ्रेंडस आॅफ बीजेपी, नॉदर्न कॅलिफोर्निया झोनच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संवादाचा कार्यक्रम झाला. आज संपूर्ण जग भारताकडे एक संधी म्हणून पाहते आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान हे आता जगातील मोजक्या शक्तिशाली नेत्यांमध्ये गणले जात आहेत.
मोदी सरकार हे निवडणुकांसाठी नाही, तर देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी काम करते आहे. आपल्यासाठी कोण पोटतिडकीने काम करतो आहे, हे मतदारांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे २०१९ मध्ये २०१४ पेक्षाही अधिक यश मोदी यांच्या नेतृत्वात मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हायपरलूपच्या चाचणी केंद्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. त्या वेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक रॉब लॉईड आदी त्यांच्यासमवेत होते.

Web Title: Mumbai-Pune Hydroloop Speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.