Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर दरड कोसळली! जीवितहानी नाही, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 00:14 IST

दरड कोसळून मातीचा लगदा रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा खोळंबा

Mumbai Pune Expressway Traffic Jam: रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास पुणेमुंबई एक्सप्रेस वे वर मौजे आडोशी गावाजवळ मुंबईकडे येणाऱ्या लाइनवर डोंगर भागातून दरड कोसळून वाहतुकीचा खोळंबा झाल्याची घटना घडली. मातीचा लगदा मुंबई बाजूच्या तिनही लेनवर पडलेला आढळला. त्यामुळे मुंबई लेनवरील वाहतूक थांबली आहे. मातीचा लगदा हा IRBचे जेसीबी आणि डंपर याच्या सहाय्याने काढून घेण्याचे काम चालू आहे. साधारणतः २० ते २५ डंपर लगदा रोडवर पडलेला आहे. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ यांच्या उपस्थितीत लगदा काढण्याचे काम चालू आहे.

टॅग्स :वाहतूक कोंडीमुंबईपुणेभूस्खलन