Join us

Mumbai Pollution: ३६५ दिवसांत २५० दिवस मुंबई प्रदूषित; कल्याण, ठाणे आणि नवी मुंबईचाही श्वास गुदमरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 06:34 IST

सर्वच विभागांत प्रदूषणाचा उच्चांक. मुंबईच्या प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून  आरोग्यासाठी मे, जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे महिने चांगले आहे. तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे महिने प्रदूषणाचे आहेत.

- सचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने दररोज हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक काढते. २०२१ या मागील वर्षातील कल्याण, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील प्रदूषणाची आकडेवारी पाहता मुंबईच्या सर्व विभागात प्रदूषणाचा आलेख वाढत असल्याचे लक्षात येते. या सर्व विभागात सरासरी २५० दिवस प्रदूषणाचे तर ११५ दिवस (आकडेवारी उपलब्ध नसलेले दिवस धरून) हे आरोग्यदायी असल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबईच्या प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून  आरोग्यासाठी मे, जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे महिने चांगले आहे. तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे महिने प्रदूषणाचे आहेत. मुंबईसह राज्याच्या हवामानात झालेल्या उल्लेखनीय बदलामुळे ११ जानेवारीपर्यंत राज्यातील बहुतांश ठिकाणांना अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे देशातील २८ राज्ये आणि ६ केंद्रशासित प्रदेशातील प्रदूषित क्षेत्रात सतत हवा गुणवत्ता मापन केंद्राद्वारे वायुप्रदूषण मोजले जाते. मुंबईमध्ये १५ ठिकाणी  आणि महाराष्ट्रात २३  ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे.- प्रा सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लानेट सोसायटी 

टॅग्स :मुंबईप्रदूषण