Join us

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:51 IST

Mumbai Police Summons Manoj Jarange Patil: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे. 

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी जरांगे-पाटील आणि त्यांच्यासह इतर पाच जणांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यावर आझाद मैदानावरील उपोषणदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे समन्स जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात केलेल्या उपोषणादरम्यान झालेल्या कथित उल्लंघनांशी संबंधित आहेत. जरांगे-पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आझाद मैदानावरील आंदोलनादरम्यान पोलिसांनी घालून दिलेल्या नियम आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. समन्समध्ये मनोज जरांगे-पाटील आणि इतर पाच जणांना १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान आझाद मैदान पोलिस स्टेशनमधील तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

पोलिसांच्या या कारवाईमुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे आणि जरांगे-पाटील यांच्या पुढील राजकीय वाटचालीचे कायदेशीर आव्हान वाढले आहे. या समन्सवर जरांगे-पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांची पुढील भूमिका काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Manoj Jarange Patil Summoned by Mumbai Police; Appearance Ordered

Web Summary : Maratha leader Manoj Jarange Patil faces increased scrutiny as Mumbai Police summons him and five others for allegedly violating regulations during his Azad Maidan hunger strike. He must appear November 10.
टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलमुंबई पोलीसमुंबईमहाराष्ट्रराजकारण