Mumbai Police spends three crores for video wall | मुंबई पोलिसांनी मोजले व्हिडीओ वॉलसाठी साडेतीन कोटी
मुंबई पोलिसांनी मोजले व्हिडीओ वॉलसाठी साडेतीन कोटी

मुंबई : मुंबई शहर व उपनगरात सुरक्षिततेच्या दृष्टिने लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पातर्गंत पोलीस आयुक्तालयात उभारण्यात आलेल्या व्हिडीओ वॉलसाठी तब्बल ३ कोटी ५२ लाख ५८ हजार रुपये मोजावे लागले आहेत. पूर्ण मुंबईतील सुरक्षितता व्यवस्थाचा आढावा घेणाऱ्या या वॉलची काम सीसीटीव्ही प्रकल्पातर्गंत कार्यान्वित करण्यात आले आहे.त्यामुळे त्याच्या कामाचे बील गृह विभागाने लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो कंपनीला नुकतेच मंजूर केले आहे.

महानगराच्या सुरक्षेच्या दृष्टिने चार वर्षापूर्वी पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत मे. लार्सन अ‍ॅण्ड ट्रबो कंपनीबरोबर करार करण्यात आला होता. त्यानुसार तीन टप्यामध्ये एकुण ४६९७ कॅमेरे बसविण्याचे ठरले होते. त्यानुसार पहिल्या टप्यात ९३७ व दुसºया आणि तिसºया टप्यात प्रत्येकी १८८० कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. ४ जून २०१६ पासून तीन टप्यात ही कामे झाली असून त्यासाठी एकुण ९८० कोटी ३३ लाख ८००२४ इतका खर्च करण्यात आला असून त्याची देयके कंपनीला टप्याटप्याने देण्यात आली आहेत. उच्चस्तरीय समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार त्यांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. त्याशिवाय याच प्रकल्पातर्गंत पोलीस आयुक्तालयात अतिरिक्त व्हिडीओ वॉल उभारण्याचे ठरवून त्यासाठी काम पुर्ण केल्यानंतर ८० टक्के व तो कर्यान्वित झाल्यानंतर २० टक्के रक्कम कंपनीला देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार वॉलच्या कामाच्या पूर्ततेचा अहवाल सल्लगार कंपनीने सरकारला सादर केला आहे. त्याला गृह विभागाने नुकतीच मंजूरी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

आयुक्तालयातील नियंत्रण कक्षामध्ये ही डिजीटल वॉल बनविण्यात आलेली असून त्यासाठी तब्बल ३ कोटी ५२ लाख ५८ हजार ३१८ रुपये खर्च मंजूर केला आहे. या प्रकल्पाच्या तिसरा टप्याचे काम पुर्ण झाल्याचे कंपनीच्यावतीने एप्रिलच्या सुरवातीला अहवाल देण्यात आला. त्यानुसार या प्रकल्पाच्या कार्यक्षमतेची तपासणी करण्यासाठी अंमलबजावणी समिती गेल्या महिन्यात नेमण्यात आली आहे. पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, पोलीस सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुक विभाग, तसेच उपायुक्त (अभियान) यांचा समावेश आहे.

 


Web Title: Mumbai Police spends three crores for video wall
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.