Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरून फेकलं; खारमधील धक्कादायक प्रकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 10:00 IST

Mumbai Khar News: मुंबईतील खार पश्चिम येथे नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरून इमारतीतील रिफ्युजी रूममध्ये फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खार पश्चिम येथे नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरून इमारतीतील रिफ्युजी रूममध्ये फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला. खार पोलीस ठाण्यातील निर्भया पथकाच्या तत्परतेमुळे या बालिकेचे प्राण वाचले असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खार पोलिसांनी छत्तीसगडची रहिवासी असलेल्या २० वर्षीय तरुणीवर गुन्हा नोंदवला आहे.

खार पोलीस ठाण्यात कार्यरत निर्भया अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शीतल मेंगडे (३५) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार सकाळी वरुण रहेजा (वय, ३८) यांचा फोन आला. ओम निर्माण इमारतीच्या १४ व १५ व्या मजल्याच्या मधील रिफ्युजी रूममध्ये कचऱ्याच्या पिशवीत नवजात बालिका आढळल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता बालिका जिवंत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर निर्भया पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बालिकेला कपड्यात गुंडाळून भाभा रुग्णालय, बांद्रा पश्चिम येथे दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर बालिकेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अविवाहित म्हणून बाळाचा त्याग केला

पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. ओम निर्माण इमारतीतील १५ व्या मजल्यावर राहणाऱ्या एका कुटुंबाकडे घरकाम करणाऱ्या आरोपी तरुणीने पहाटे सुमारे ४ वाजता सदर बालिकेला जन्म दिल्याचे कबूल केले.  अविवाहित असल्यामुळे बालिकेचा त्याग करण्याच्या उद्देशाने तिला कचऱ्याच्या पिशवीत ठेवून रिफ्युजी रूममध्ये टाकल्याचेही तिने सांगितले. प्रसूतीनंतर या तरुणीची प्रकृती खालावल्याने तिलाही भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Newborn girl found in trash; shocking incident in Khar!

Web Summary : A newborn girl was found abandoned in a trash bag in Khar, Mumbai. Police rescued the baby, who is now receiving treatment. A 20-year-old woman from Chhattisgarh has been arrested. She confessed to abandoning the baby because she is unmarried.
टॅग्स :गुन्हेगारीमुंबई