Mumbai police force changed | मुंबई पोलीस दलात बदल
मुंबई पोलीस दलात बदल

मुंबई : मुंबई पोलीस दलात अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत़ यात १४ पोलीस उपायुक्तांकडे महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. मुंबई पोलीस प्रवक्ते मंजुनाथ सिंगे यांच्यावर परिमंडळ ८ ची जबाबदारी सोपवून त्यांच्या जागी नागपूरच्या राज्य राखीव बलाचे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांची नेमणूक करण्यात आली. ठाणे परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्याकडे परिमंडळ १०, तर ठाण्यातील विशेष शाखा १ चे डी. एस. स्वामी यांच्यावर परिमंडळ १२ ची जबाबदारी दिली आहे. एटीएसचे मोहन दहिकर यांच्यावर परिमंडळ ११ आणि राज्य राखीव बलातील सी. के. मीणा यांच्याकडे नायगाव सशस्त्र पोलीस दलाचा पदभार दिला आला. औरंगाबाद लाचलुचपत विभागातून मुंबईत बदली झालेल्या श्रीकांत एम. परोपकारी यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाची आणि नाशिकचे नंदकिशोर ठाकूर यांच्याकडे सशस्त्र पोलीस दल ताडदेव विभागाची जबाबदारी दिली आहे़ सोमनाथ घार्गे यांची मरोळच्या सशस्त्र पोलीस दलात बदली केली आहे.
परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांच्याकडे परिमंडळ १ तर, आर्थिक गुन्हे शाखेचे राजीव जैन यांच्याकडे परिमंडळ २ ची जबाबदारी दिली आहे. नायगाव सशस्त्र पोलीस दलातील नियती ठक्कर यांच्याकडे परिमंडळ ५ ची जबाबदारी दिली आहे. वाहतूक मुख्यालय व पूर्व उपनगराचे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांच्यावर गुन्हे प्रकटीकरणाचा कार्यभार दिला; त्यांच्या जागी रंजन शर्मा नियुक्त झाले़


Web Title: Mumbai police force changed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.