Join us  

Today's Fuel Price: इंधन दरकपातीचा दिलासा ! सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 7:44 AM

Petrol & Diesel Prices : सलग बाराव्या दिवशी इंधनाच्या दरांमध्ये कपात झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे.

मुंबई - सलग बाराव्या दिवशी इंधनाच्या दरांमध्ये कपात झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या प्रतिलिटर दरामध्ये  30 पैशांची कपात झाली आहे तर डिझेल 21 पैशांनी स्वस्त झाले आहे. यानुसार मुंबईकरांना पेट्रोलसाठी 85.24 रुपये आणि डिझेलसाठी 77.40 रुपये मोजावे लागणार आहेत. राजधानी नवी दिल्लीतही पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे. येथे पेट्रोल 30 पैसे त डिझेल 20 पैशांनी स्वस्त झाले आहे. दरकपातीनुसार आज येथे पेट्रोल प्रतिलिटर 79.75 रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर दर 73.85 रुपये एवढे आहेत. 

दिवाळी सणाच्या तोंडावर इंधनाच्या दरांमध्ये कपात होत असल्यानं सर्वसामान्यांना थोडासा का होईना पण दिलासा मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून काही डॉलरमध्ये उतरत असताना देशातील इंधनाचे दर काही पैशांमध्ये उतरवण्यात येत आहेत. 

आगामी काळात काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तसेच पुढील काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुकांनाही सत्ताधारी भाजपाला सामोरे जायचे असल्याने इंधनाच्या वाढत्या दरांवरून मोदी सरकार चिंतेत होते. यामुळे गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन पुरवठादार कंपन्यांसोबत बैठक घेतली होती. यानंतर इंधनाच्या दरांमध्ये घसरण पहायला मिळत आहे. 

मुंबई :  पेट्रोल-डिझेलच्या दरांमधील घट

            तारीख                      पेट्रोल/ प्रतिलिटर             डिझेल/ प्रतिलिटर
18 ऑक्टोबर              88.08 रुपये (0.21पैशांची घट)79.24 रुपये (0.11 पैशांची घट)
19 ऑक्टोबर              87.84 रुपये (0.24 पैशांची घट)79.13 रुपये (0.11 पैशांची घट)
20 ऑक्टोबर              87.46 रुपये (0.38 पैशांची घट)79.00 रुपये (0.13 पैशांची घट)
21 ऑक्टोबर             87.21 रुपये (0.25 पैशांची घट)78.82 रुपये (0.18 पैशांची घट) 
22 ऑक्टोबर             86.91 रुपये (0.30 पैशांची घट)78.54 रुपये (0.28 पैशांची घट)
23 ऑक्टोबर             86.81 रुपये (0.10पैशांची घट)78.46 रुपये (0.08 पैशांची घट)
24 ऑक्टोबर             86.73 रुपये (0.08 पैशांची घट)78.45 रुपये 
25 ऑक्टोबर             86.58 रुपये (015 पैशांची घट)78.40 रुपये (0.05 पैशांची घट)
26 ऑक्टोबर             86.33 रुपये (0.25 पैशांची घट) 78.33 रुपये (0.08 पैशांची घट)
27 ऑक्टोबर             85.93 रुपये (0.40 पैशांची घट)  77.96 रुपये (0.37 पैशांची घट)
28 ऑक्टोबर            85.54 रुपये (0.39 पैशांची घट) 77.61 रुपये (0.35 पैशांची घट)
29 ऑक्टोबर             85.24 रुपये (0.30 पैशांची घट)77.40 रुपये (0.21 पैशांची घट)

 

 

टॅग्स :पेट्रोलइंधन दरवाढडिझेल