मुंबईकरांना मिळणार पुराचे पूर्वानुमान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 06:34 AM2019-12-15T06:34:34+5:302019-12-15T06:34:52+5:30

केंद्रीय भू-विज्ञान मंत्रालयाची माहिती । येत्या पावसाळ्यात ‘मुंबई फ्लड वॉर्निंग सिस्टीम’ होणार कार्यान्वित

Mumbai people will get forecast of flood | मुंबईकरांना मिळणार पुराचे पूर्वानुमान

मुंबईकरांना मिळणार पुराचे पूर्वानुमान

Next

मुंबई : पावसाच्या पाण्यात दरवर्षी तुंबणाऱ्या मुंबईकरांना या वर्षीच्या पावसात ‘मुंबई फ्लड वॉर्निंग सिस्टीम’चा दिलासा मिळणार आहे. ‘चेन्नई फ्लड वॉर्निंग सिस्टीम’प्रमाणेच आता मुंबईतदेखील ‘मुंबई फ्लड वॉर्निंग सिस्टीम’ कार्यान्वित होणार असून, पावसाचे अचूक भाकीत वर्तवितानाच मुंबईत ठिकठिकाणी किती पाऊस पडेल, पावसामुळे कुठे किती पूर येईल, यासह पावसाची नोंद किती होईल; याची इंत्थभूत माहिती या माध्यमातून मुंबईकरांना अ‍ॅपद्वारे उपलब्ध होणार आहे.


केंद्रीय भू-विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन राजीवन यांनी शनिवारी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या कार्यालयाला भेट दिली. या वेळी राजीवन यांनी हवामान खात्याच्या अधिकारी वर्गासोबत बैठक घेत ‘मुंबई फ्लड वॉर्निंग सिस्टीम’च्या कामाच्या आढाव्यासह रडार आणि हवामान खात्याच्या उर्वरित कामाचीही माहिती घेतली. या वेळी राजीवन यांनी प्रसारमाध्यमांशीही संपर्क साधला. तेव्हा त्यांनी ‘मुंबई फ्लड वॉर्निंग सिस्टीम’बाबत माहिती दिली.


माधवन राजीवन आणि मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, येत्या पावसाळ्यापासून ‘मुंबई फ्लड वॉर्निंग सिस्टीम’ कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रारंभी टेस्ट स्वरूपात अमलात आणण्यात येणारी ही सिस्टीम त्यानंतरच्या पावसाळ्यात अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने कार्यान्वित करण्यात येईल. माधवन यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, दरवर्षी मुंबईकरांना मोठ्या पावसाळ्यास सामोरे जावे लागते. पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल होतात. ‘मुंबई फ्लड वॉर्निंग सिस्टीम’ अशा वेळीच नागरिकांना मदत करणार आहे.


पावसाचे अंदाज वर्तवितानाच कुठे किती पाऊस पडला, कुठे किती पूर येईल; पुराच्या पाण्याची पातळी किती असेल. भरती-ओहोटी कोणत्या वेळी असेल, अशी माहिती ‘मुंबई फ्लड वॉर्निंग सिस्टीम’च्या मदतीने मिळेल. विशेषत: प्रत्येक केंद्रावर मोजला जाणारा पाऊस, पंधरा मिनिटांच्या अंतराने मोजला जाणारा पाऊस; या गोष्टींची माहिती याद्वारे मिळेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई पालिकेच्या मदतीने ‘मुंबई फ्लड वॉर्निंग सिस्टीम’ बनविण्यात येत असून, आताच्या दोन रडारव्यतिरिक्त हवामान खाते आणखी चार रडार बसविणार आहे.


मुंबई महापालिकाही आली मदतीला
च्‘मुंबई फ्लड वॉर्निंग सिस्टीम’ जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीमवर आधारित आहे.
च्प्रत्येक नागरिकासाठी ‘मुंबई फ्लड वॉर्निंग सिस्टीम’ यासंदर्भातील अ‍ॅप खुले राहील.
च्मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने यासाठी मुंबई महापालिकेची मदत घेतली आहे.

मान्सूनचा बदलता पॅटर्न, उष्णतेच्या लाटांचाही अभ्यास
च्काय हानी होऊ शकते किंवा कसा फटका बसू शकतो; असा ‘इम्पॅक्ट बेस फॉरकास्ट’ देण्यावर हवामान खाते भविष्यात भर देणार आहे.
च्विजेची चेतावनी देणारी ‘दामिनी’ आणि मच्छीमारांना माहिती देणारी ‘जेमिनी’ या दोन्ही सेवांचा नागरिकांना फायदा होत आहे.
च्मान्सूनचा बदलता पॅटर्न, उशिराने दाखल होणारी थंडी, उष्णतेच्या लाटा; या सर्वांचा अभ्यास करण्यात येत आहे.
च्दीर्घकाळ लागून राहणाºया पावसाचे प्रमाण आता कमी झाले आहे. त्याऐवजी अतिवृष्टीचे किंवा कमी वेळेत जास्त पडणाºया पावसाचे प्रमाण वाढले आहे.
च्आपत्कालीन व्यवस्थापनावर अधिकाधिक जोर दिला जाणार आहे.
च्अद्ययावत अशा कुशल तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

लोकसहभाग गरजेचा
लोकसहभागाशिवाय सरकार काहीच करू शकत नाही. आपत्कालीन घटनांना तोंड देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरूच असतात. मात्र बदलते ऋतुचक्र आणि जागतिक तापमानवाढ या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र येत काम केले पाहिजे.
- डॉ. माधवन राजीवन

Web Title: Mumbai people will get forecast of flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर