Join us  

उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: पूनम महाजनांना आघाडी; प्रिया दत्त 42 हजार मतांनी पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 11:31 AM

महाजनांकडे मोठी आघाडी

केंद्रात मंत्रीपद भूषवलेल्या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या लेकींमधील चुरस उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात पाहायला मिळते आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या आमनेसामने असलेल्या भाजपाच्या पूनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी यंदाही एकमेकांना आव्हान दिलं. आजी-माजी खासदारांच्या या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात पूनम महाजन यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना 104396 मतं मिळाली असून प्रिया दत्त यांच्या पारड्यात 62447 मतं पडली आहेत.

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात एकूण 17 लाख 38 हजार 894 मतदार आहेत. यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात 53.64 टक्के मतदान झालं. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात 55 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का घसरला आहे. याचा फटका कोणाला बसणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

गेल्या निवडणुकीत पूनम महाजन यांनी 4 लाख 78 हजार 535 मतं मिळवली होती. तर प्रिया दत्त यांना 2 लाख 91 हजार 764 मतं मिळाली होती. विशेष म्हणजे एक अपवाद वगळता या मतदारसंघानं एकाच पक्षाला सलग दोनदा संधी दिलेली नाही. त्यामुळे यंदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार की इतिहास घडणार याची उत्सुकता आहे. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक निकालमुंबई उत्तर मध्यपूनम महाजनप्रिया दत्तभाजपाकाँग्रेस