Join us

VIDEO: गणपतीचा मंडप लावण्यावरुन महिलेला भररस्त्यात मारहाण; मुंबादेवी परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 21:16 IST

मुंबईतील मुंबादेवी परिसरात महिलेला मारहाण झाली, मारहाण करणारे मनसेचे स्थानिक पदाधिकारी असल्याची माहिती आहे.

मुंबई:मुंबईतील मुंबादेवी परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन झालेल्या वादात एका महिलेला भररस्त्यात मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत असून, यात एक व्यक्ती महिलेला सर्वांसमोर गालात चापट मारताना आणि धक्काबुक्की करताना दिसत आहे. महिलेला मारहाण करणारा व्यक्ती मनसेचा स्थानिक पदाधिकारी असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण 28 ऑगस्टचे आहे. गणपतीच्या मंडपाचा खांब उभारण्यावरुन वाद झाला. यावेळी एका व्यक्तीने सर्वांसमोर महिलेला मारहाण केली. विनोद अरगिले असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो मनसेचा विभाग प्रमुख असून, पोलिसांनी त्याच्यासह राजू अरगिले, सतीश लाढ यांना ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय झालं?मुंबादेवी परिसरात मनसेचे कार्यकर्ते मंडपाचा खांब उभारत होते. यावेळी प्रकाश देवी नावाच्या महिलेने त्यांना तिच्या औषध दुकानासमोर खांब न लावण्यास सांगितले. यावेळी मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केली. 80 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये महिलेला मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. विशेष म्हणजे, यावेळी एकही स्थानिक हस्तक्षेप करत नाहीत. या प्रकरणावर अद्याप मनसेकडून प्रतिक्रिया आलेली नाही.

टॅग्स :मुंबईगणेश मंडळ 2019मनसे