मुंबई - अभिनेती कंगना राणौत हिने मुंबईूबाबत केलेल्या विधानामुळे सध्या मुंबई आणि राज्यातील वातावरण ढवळून निघालेले आहे. विविध क्षेत्रातून कंगनाच्या या विधानावर जोरदार आक्षेप घेऊन टीका करण्यात येत आहे. दरम्यान, काल मुंबईची तुलना पीओकेशी करणाऱ्या कंगना राणौतला रात्री उपरती झाली असून, तिने मुंबई ही आपली कर्मभूमी असून, मुंबईने मला यशोदामाईसारखे सांभाळले आहे, असे विधान केले आहे.सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सध्या आक्रमकपणे बोलत असलेल्या कंगना शिवसेना आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमकी होत असून, त्याचदरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पीओकेशी केल्याने वादाला तोंड फुटले होते. दरम्यान, चहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर कंगनाने मुंबईबाबतची आपली भावना ट्विट करून व्यक्त केली आहे. त्यात ती म्हणते की, महाराष्टामधील माझ्या मित्रांचे आभार माणण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. त्यांना माझ्या बोलण्याचा रोख माहिती आहे. तसेच माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईवर असलेल्या माझ्या प्रेमाचा पुरावा देण्याचीही मला गरज वाटत नाही. मुंबईने मला नेहमीच यशोदामाईप्रमाणे सांभाळले आहे.
मुंबई माझी कर्मभूमी, तिने मला यशोदामाईसारखं सांभाळलं; विवादानंतर कंगनाला उपरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 05:47 IST