मुंबईतील गोरेगाव परिसरात एक धक्कादायक घडली. एका व्यक्तीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरातील बेडमध्ये लपवला. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तपासणी केली असता धक्कादायक प्रकार उघड झाला. मृत महिलेच्या पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर येथील एका व्यक्तीने पत्नीची हत्या केली आणि तिचा मृतदेह बेडमध्ये लपवून फरार झाला. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. सुरुवातीला पोलिसांना लगेच मृतदेह सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी घरातील बेडची तपासणी केली असता महिलेचा मृतदेह आत लपवून ठेवल्याचे आढळून आले.
याप्रकरणी पोलिसांनी पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. हत्येचे कारण अस्पष्ट असून महिलेच्या पतीला अटक केल्यानंतर त्यामागचा हेतू स्पष्ट होईल. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिद्धार्थ रुग्णालयात पाठवला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली.