मुंबई महानगरपालिका पी/दक्षिण विभाग: पर्यटनाला आकर्षित करणारा विभाग 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 09:54 AM2023-12-21T09:54:14+5:302023-12-21T09:56:20+5:30

२७ आदिवासी पाडे, महागड्या हिऱ्या मोत्यापासून ते मोठमोठ्या मशीनच्या लहानशा नटबोल्टपर्यंत सर्वच गोष्टीचे प्रदर्शनाचे ठिकाण.  

Mumbai munncipalty p south division tourism Attracting Division | मुंबई महानगरपालिका पी/दक्षिण विभाग: पर्यटनाला आकर्षित करणारा विभाग 

मुंबई महानगरपालिका पी/दक्षिण विभाग: पर्यटनाला आकर्षित करणारा विभाग 

२७ आदिवासी पाडे, महागड्या हिऱ्या मोत्यापासून ते मोठमोठ्या मशीनच्या लहानशा नटबोल्टपर्यंत सर्वच गोष्टीचे प्रदर्शनाचे ठिकाण.  त्यात हजारोंना समाविष्ट करून घेण्याची कुवत असलेले नेसकोसारखे प्रदर्शन केंद्र, मुंबईचे फुफ्फुस म्हणून ख्याती असलेले आरेचे जंगल, अनेक लोकप्रिय मालिका, नावाजलेल्या चित्रपटांचे शूटिंग या ठिकाणी असलेल्या फिल्म सिटीमध्ये होत असल्याने हजारोंना रोजगार मिळतो. यामुळे गोरेगाव पश्चिमच्या ‘पी दक्षिण’ला पर्यटनाला आकर्षित करणारा विभाग म्हणून ओळखले जाते.

हद्द पूर्व व पश्चिम :

पूर्व : आरे वसाहत
पश्चिम : बांगुर नगर खाडी, पश्चिम रेल्वे मार्शेलींग यार्ड
उत्तर : फिल्मसिटी, अप्पर गोविंद नगर, चिंचोली बंदर
दक्षिणेस : ओशिवरा नदी

वॉर्डाचे वैशिष्ट्य :

दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे चित्रपटांचे चित्रीकरण होते. तसेच मुंबई सारख्या मायानगरीत आरे वसाहती अन्वये हरितपट्टा स्थापित आहे. 
 तथा संपूर्ण मुंबईस असे एकच प्रदर्शन केंद्रान्वये नेस्को प्रदर्शन केंद्र गोरेगाव (पूर्व) येथे प्रस्थापित आहे.
 पश्चिम द्रुतगती महामार्ग आरे वसाहतीच्या सीमारेषेवर पशुवैद्यकीय महाविद्यालय हे पी/दक्षिण विभागात येते.

मुख्य समस्या :

राजीव गांधीनगर येथे दरड कोसळण्याची ठिकाणे आहेत. स्थानिकांचे प्रबोधन करून त्यांना चेंबूर येथे स्थलांतरित केले आहे. परंतु स्थलांतरित केलेल्या जागेवर संरक्षण भिंतीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. खाडीजवळील टोकाकडील भागास पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही. स्थानिकांना पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी जलकामे खात्यामार्फत कार्यवाही प्रगतिपथावर आहे.


महापालिका प्रभाग माजी नगरसेवक: 

दीपक ठाकूर : वॉर्ड क्र. ५० 
स्वप्नील टेंबवलकर : वॉर्ड क्र.५१ 
प्रीती सातम : वॉर्ड क्र. ५२ 
रेखा रामवंशी : वॉर्ड क्र. ५३ 
साधना माने : वॉर्ड क्र. ५४ 
हर्ष पटेल : वॉर्ड क्र. ५५ 
राजुल देसाई : वॉर्ड क्र. ५६ 
श्रीकला पिल्लाई : वॉर्ड क्र. ५७ 
संदीप पटेल : वॉर्ड क्र. ५८

स्वामी विवेकानंद मार्गावरील ओशिवरा नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने व इतर विकासकामांमुळे वाहतूक कोंडीची समस्या होत आहे. पावसाळ्यात नाले तुंबून पाणी साचण्याची ठिकाणे कमी होण्याच्या उद्देशाने खाडी क्षेत्राजवळील शास्त्रीनगर नाला रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. प्रभागातील अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. गोरेगाव मुलुंड लिंक रस्त्याचे काम, मृणालताई गोरे पुलाचे विस्तारीकरण, टोपीवाला मंडईचे नूतनीकरण, सिद्धार्थ सर्वसाधारण रुग्णालयाचे नूतनीकरण आदी कामांना वेग मिळाला आहे. - संजय ब. जाधव, सहायक आयुक्त, पी / दक्षिण

शैक्षणिक संस्था: विवेक कॉलेज, पाटकर कॉलेज, लॉर्ड्स कॉलेज, आय वाय एज्युकेशन ट्रस्ट, रायन इंटरनॅशनल स्कूल, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन स्कूल, विटी इंटरनॅशनल.

पर्यटनस्थळे: छोटा काश्मीर, पिकनिक पॉईंट, दादासाहेब फाळके चित्रनगरी, आरे तलाव

२ डिस्पेन्सरी: सिद्धार्थ रुग्णालय, गोकुळधाम मेडिकल सेंटर, वसुधा रुग्णालय, लाईफ लाईन मेडिकेअर, मातोश्री गोमती रुग्णालय

Web Title: Mumbai munncipalty p south division tourism Attracting Division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.