मुंबई महापालिकेला मिळणार पहिली महिला आयुक्त! आयुक्तपदी अश्विनी भिडेंचे नाव निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 23:36 IST2026-03-30T23:28:58+5:302026-03-30T23:36:45+5:30

विद्यमान आयुक्त भूषण गगराणी यांचा कार्यकाळ ३१ मार्च २०२६ रोजी संपत असल्याने, त्यानंतर ही मोठी जबाबदारी भिडे यांच्याकडे सोपवली जाऊ शकते.

Mumbai Municipal Corporation will get its first female commissioner Ashwini Bhide's name confirmed as commissioner | मुंबई महापालिकेला मिळणार पहिली महिला आयुक्त! आयुक्तपदी अश्विनी भिडेंचे नाव निश्चित

मुंबई महापालिकेला मिळणार पहिली महिला आयुक्त! आयुक्तपदी अश्विनी भिडेंचे नाव निश्चित

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला आता पहिली महिला आयुक्त मिळण्याची शक्यता आहे. १९९५ बॅचच्या अनुभवी आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची या रिक्त होणाऱ्या पदावर वर्णी लागण्याची चर्चा सध्या मंत्रालयात रंगली आहे. विद्यमान आयुक्त भूषण गगराणी यांचा कार्यकाळ ३१ मार्च २०२६ रोजी संपत असल्याने, त्यानंतर ही मोठी जबाबदारी भिडे यांच्याकडे सोपवली जाऊ शकते.

जागतिक अर्थव्यवस्थेला 'इराण युद्धाचा' विळखा! मंदीचं सावट आणि महागाईचा भडका; IMF ने धोक्याची घंटा वाजवली

अश्विनी भिडे सध्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून अत्यंत आव्हानात्मक पायाभूत प्रकल्प यशस्वीपणे हाताळले आहेत. त्यांच्या कामाची शिस्त आणि तांत्रिक बाबींवरील पकड यामुळेच त्यांचे नाव आघाडीवर आहे.

आयुक्त पदासाठी संजय मुखर्जी आणि असीम गुप्ता यांच्या नावांचीही चर्चा सुरू होती. मात्र, मुंबईतील पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय गुंतागुंत हाताळण्याचा अश्विनी भिडे यांचा अनुभव पाहता, सरकारने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. जर त्यांची निवड झाली, तर त्या २०३० पर्यंत या पदाचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण करतील, अशी अपेक्षा आहे.

मुंबईतील रस्ते, कोस्टल रोड आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहेत. अशा वेळी अश्विनी भिडे यांची नियुक्ती मुंबईच्या पायाभूत विकासासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बीएमसीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेच्या हाती मुंबईचा कारभार येणार असल्याने या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : मुंबई को मिल सकती हैं पहली महिला नगर आयुक्त: अश्विनी भिडे

Web Summary : अश्विनी भिडे मुंबई नगर निगम की पहली महिला आयुक्त बन सकती हैं। एक आईएएस अधिकारी भिडे ने पहले चुनौतीपूर्ण बुनियादी ढांचा परियोजनाओं का प्रबंधन किया है। उनकी नियुक्ति 2026 में वर्तमान आयुक्त का कार्यकाल समाप्त होने के बाद होने की उम्मीद है। उनसे मुंबई में महत्वपूर्ण बुनियादी ढांचा परियोजनाओं की देखरेख करने की उम्मीद है।

Web Title : Mumbai Likely to Get First Woman Municipal Commissioner: Ashwini Bhide

Web Summary : Ashwini Bhide is likely to become the first woman commissioner of Mumbai's Municipal Corporation. Bhide, an IAS officer, previously managed challenging infrastructure projects. Her appointment is anticipated after the current commissioner's term ends in 2026. She is expected to oversee crucial infrastructure projects in Mumbai.