mumbai municipal corporation seized two helicopters for not filing Tax | कर थकवणाऱ्या विमान कंपनीची दोन हेलिकॉप्टर जप्त

कर थकवणाऱ्या विमान कंपनीची दोन हेलिकॉप्टर जप्त

मुंबई : आर्थिक वर्ष संपण्यास अवघा महिना उरला असताना उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीत मोठी घट दिसून येत आहे़ त्यामुळे महापालिकेने थकबाकीदारांवर कठोर कारवाई सुरू केली आहे़ त्यानुसार तब्बल एक कोटी ६४ लाख रुपये थकविणाºया विमान कंपनीची दोन हेलिकॉप्टर महापालिकेने जप्त केली. अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.

जकात कर बंद झाल्यानंतर मालमत्ता कर महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत बनले आहे़ मात्र पाचशे चौरसफुटांच्या मालमत्तांना करमाफी आणि बांधकाम क्षेत्रातील मंदीचा मोठा फटका पालिका प्रशासनाला यंदा बसला आहे़ यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली असून मालमत्ता कराची आतापर्यंतची थकबाकी १५ हजार कोटींवर पोहोचली आहे़ त्यामुळे यापैकी किमान १० टक्के रक्कम तरी वसूल करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले आहे.

२२८ थकबाकीदारांची यादी गेल्या महिन्यात तयार करून त्यांना पालिकेच्या कर निर्धारक व संकलन खात्याने नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. या कारवाई अंतर्गत मेस्को एअरलाइन्स या विमान कंपनीवर पालिकेने जप्तीची कारवाई केली आहे़ या कंपनीने एक कोटी ६४ लाख ८३ हजार ६५८ रुपये मालमत्ता कर थकविला आहे. नियमानुसार पाठपुरावा करूनही सदर विमान कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने मंगळवारी पालिकेने या कंपनीची दोन हेलिकॉप्टर जप्त केली आहेत. दरम्यान, मालमत्ता कर धकविल्याप्रकरणी वाधवा ट्रेड सेंटर या कंपनीचाही पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

प्रलंबित प्रकरणांमुळे अडकले १५ हजार कोटी
जकात कराच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत ३० टक्क्यांहून अधिक उत्पन्न दरवर्षी जमा होते. मात्र जकात कर रद्द करून २०१७ मध्ये वस्तू व सेवा कर लागू करण्यात आला़ जकात कराच्या मोबदल्यात नुकसानभरपाई म्हणून राज्य सरकारकडून पालिकेला ठरावीक रक्कम दरमहा देण्यात येते़
मात्र जीएसटीच्या माध्यमातून राज्य सरकारकडून येणारी रक्कम २०२२ पासून बंद करण्यात येणार आहे़ त्यामुळे उत्पन्नाचे मोठे स्रोत महापालिकेला विकसित करावे लागणार आहेत.
मालमत्तांची विविध प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याने महापालिकेचे तब्बल १५ हजार कोटी रुपये अडकले आहेत़ राज्य सरकारच्या नियमानुसार ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी सदनिकांना मालमत्ता करात सूट दिल्याने ३३५ कोटींनी महसूल कमी झाला आहे.

Web Title: mumbai municipal corporation seized two helicopters for not filing Tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.