लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स न बसविल्याने मुंबईतील १०६ ठिकाणांची बांधकामे त्वरित थांबविण्यासाठी महापालिका प्रशासनाने संबंधितांना नोटीस बजावली. यामध्ये सायन रेल्वे पूल, म्हाडा व एसआरए प्रकल्पांचाही समावेश आहे. वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपायुक्त अविनाश काटे यांनी सांगितले.
मुंबईतील वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये सर्व बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी ‘एअर क्वालिटी सेन्सर्स’ कार्यान्वित करणे, यापूर्वीच बंधनकारक केले आहे. जवळपास १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये ‘रेफरन्स ग्रेड एअर क्वालिटी मॉनिटर’ बसविण्याचेही आदेश दिले आहेत. मात्र, काही बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी संबंधित आदेशांचे पालन होत नसल्याचे दिसून आले. वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करीत असल्याने अखेर बांधकाम त्वरित बंद करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत.
बेकरीवरही कारवाई
कारवाई केवळ बांधकाम क्षेत्रापुरतीच मर्यादित नसून नियमांचे पालन न करणाऱ्या बेकरी युनिट्सलाही नोटीस देण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाला दिल्या आहेत. धूर, इंधन वापर आणि उत्सर्जन मानकांचे उल्लंघन करणाऱ्याप्रकरणी कडक कारवाई करण्यात येणार आहे.
Web Summary : Mumbai municipality halted 106 construction sites for not installing air quality sensors. Notices were issued to SRA and MHADA projects. Bakeries violating emission norms also face action.
Web Summary : मुंबई नगर निगम ने वायु गुणवत्ता सेंसर स्थापित न करने पर 106 निर्माण स्थलों को रोका। एसआरए और म्हाडा परियोजनाओं को नोटिस जारी किए गए। उत्सर्जन मानदंडों का उल्लंघन करने वाली बेकरियों पर भी कार्रवाई।