Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई यावर्षी पण तुंबणार? उरला दीड महिना अन् ६८ टक्के नालेसफाई अजून शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 16:17 IST

आयुक्तांच्या इशाऱ्याला अधिकारी-कंत्राटदारांकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई :मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी केली जाणारी नालेसफाई ३१ मेपर्यंत ८० टक्के झालीच पाहिजे, या महापालिका आयुक्त भूषण नगराणी यांनी दिलेल्या इशाऱ्याला पालिका अभियंते आणि कंत्राटदारांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. आयुक्तांनी दिलेल्या मुदतीला दीड महिना शिल्लक असताना कंत्राटदारांनी आतापर्यंत केवळ १२ टक्के नालेसफाई केल्यामुळे पाडसाळ्यापूर्वी उर्वरित उद्दिष्टाची ६८ टक्के शिल्लक असलेली नालेसफाई कशी होणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

नालेसफाईच्या कामाच्या नियोजनानुसार मुंबईत पावसाळ्यापूर्वी ८० टक्के, पावसाळ्यात १० टक्के आणि पावसाळा संपल्यानंतर १० टक्के अशा तीन टप्प्यात छोट्या आणि मोठ्या नाल्यातील गाळ काढला जातो. महापालिकेने यंदा ही कामे लवकर व्हावीत यासाठी २३ कंत्राटदारांकडे नालेसफाई आणि मिठी व इतर नदी पात्रातील गाळ काढण्याची कामे दिली आहेत. त्यासाठी पालिका तब्बल ३९५ कोटी रुपये खर्च कमणार आहे.

फोटो, व्हिडीओ बंधनकारक 

दरवर्षीचा अनुभव पाहता या कामात हलगर्जीपणा अथवा गैरप्रकार होऊ नये वासाठी पालिका आयुक्तांनी अतिशय कडक अरी शर्ती आणि नियम लागू केले आहेत. 

कंत्राटदारांनी नालेसफाई काम सुरू करण्यापूर्वी आणि काम पूर्ण केल्यानंतर फोटो आणि व्हिडीओ शूटिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, संबंधित विभागातील अभियंत्यांना कामाच्या ठिकाणी हजर राहण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. 

मात्र महापालिका अधिकारी आणि कर्मचान्यांची कामावर कड़क देखरेख असूनही नालेसफाईची कामे अत्यंत धीम्यागतीने सुरू असल्याचे निदर्शनास येत असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.

कंत्राटदारांवर कारवाई? 

पावसाचे पाणी साचण्याच्या संभाव्य तिकाणाच्या १०० मीटर घरिमसतील लहान, मोठे नाले चांगल्या पद्धतीने स्वच्छ होत आहेत की नाही याची नालेनिहाय तपासणी पर्जन्य जलवाहिनी विभागाचे अधिकारी करत आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचते, अशा ठिकाणी महापालिकेने पाणी उपसा करण्यासाठी पंप बसवले आहेत.

है पंप पावसाळ्यात बंद पडणार नाहीत, याचीही खबरदारी घेतली जाते. काही ठिकाणी मोबाइल पंच तैनात ठेवण्यात आले असून एखाद्या ठिकाणच्या पंचामध्ये ऐनवेळी बिघाड झाल्यास त्या ठिकाणी या मोबाइल पंपाद्वारे पाणी उपस्त सुरू ठेवण्याचा पालिकेचा विचार आहे.

मात्र, जर अशा पंपामध्ये सातत्याने बिघाड इराला आणि पाणी साचण्याच्या घटना घडल्या तर पंप पुरविणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्त गगराणी यांनी दिला आहे.

निश्चित केलेल्या ८० टक्क्यातील फक्त १२ टक्केच नालेसफाई झाली आहे. पालिका अभियंत्यांचे निरीक्षण आणि देखरेख असूनही नालेसफाईच्या कामांमध्ये होत असलेली चालढकल अक्षम्य आहे- अॅड. अमोल मातेले, प्रवक्ते राष्ट्रवादी शरद पवार गट 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिकापाऊसमोसमी पाऊस