प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 07:01 IST2025-06-13T07:01:37+5:302025-06-13T07:01:40+5:30

Mumbai Municipal Corporation Election: राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम नगरविकास विभागाने गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रभाग रचना पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे. ती नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पुढे जाऊ शकते.

Mumbai Municipal Corporation Election: Ward formation to be completed in September; Municipal elections only after October! | प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब

प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब

मुंबई -  राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम नगरविकास विभागाने गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रभाग रचना पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे. ती नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पुढे जाऊ शकते.

वेळापत्रकानुसार ९ टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्तांनी मुंबई महापालिकेची अंतिम केलेली प्रभाग रचना ही २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाईल. अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना ही २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाईल. ड दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाईल. नगर परिषदा आणि नगरपंचायतींची अंतिम प्रभाग रचना ही राज्य निवडणूक आयुक्त २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान जाहीर करतील.

याचा अर्थ अंतिम प्रभाग रचना ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होईल. त्यानंतर दोन महत्त्वाचे टप्पे असतील. आधी प्रभागांचे आरक्षण जाहीर केले जाईल आणि नंतर प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. हे दोन टप्पे पूर्ण व्हायला किमान एक ते दीड महिना लागतो, असा पूर्वानुभव आहे. हे लक्षात घेता ऑक्टोबरच्या शेवटी वा नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सर्व कार्यवाही पूर्ण होऊनच निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागेल. त्यामुळे महापालिका व नगरपालिकांची निवडणूक नोव्हेंबर वा डिसेंबरपर्यंत पुढे जाण्याची शक्यता आहे.

कार्यक्रमाचे टप्पे
प्रगणक गटांची मांडणी करणे
प्रारूप प्रभाग रचना तयार करणे
प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास पाठविणे
राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता देणे
प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे आणि त्यावर हरकती, सूचना मागविणे
जिल्हाधिकारी वा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्राप्त हरकती, सूचनांवर सुनावणी घेणे

सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगास मान्यतेसाठी पाठविणे
राज्य निवडणूक आयुक्तांनी मान्यता दिलेली रचना संबंधित महापालिका आयुक्त/ मुख्याधिकारी यांना कळविणे आणि
राज्य निवडणूक आयुक्तांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे

Web Title: Mumbai Municipal Corporation Election: Ward formation to be completed in September; Municipal elections only after October!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.