Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणातील विदूषक, ते बोलतात त्यात…’ अमित साटम यांची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 10:05 IST

Mumbai Municipal Corporation Mayor Election: अटीतटीच्या झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला काठावरचं बहुमत मिळालं होतं. तर ठाकरे बंधूंच्या युतीलाही बऱ्यापैकी जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

अटीतटीच्या झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला काठावरचं बहुमत मिळालं होतं. तर ठाकरे बंधूंच्या युतीलाही बऱ्यापैकी जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तसेच उद्धवसेनेला या निवडणुकीत काही तरी चमत्कार होऊन आकड्यांचं गणित जुळेल, अशी अपेक्षा आहे. महापौर निवडीपूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून एकनाथ शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. त्यावरून  उद्धवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदेसेनेवर टीका केली होती. तसेच कोंडून ठेवले तरी संपर्क साधण्याचे अनेक मार्ग आहेत, असा दावाही राऊत यांनी केला होता. त्याला आता भाजपाचे मुंबईतील अध्यक्ष अमित साटम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना अमित साटम म्हणाले की, आपण जेव्हा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जातो, तेव्हा तिथे एनसी म्हणजेच अदखलपात्र असा एक प्रकार असतो. तसे महाराष्ट्राच्या राजकारणातील अदखलपात्र एजंट किंवा अदखलपात्र आयटम संजय राऊत आहेत. त्यांच्याकडे कुणी लक्ष देण्याची गरज नाही. ते महाराष्ट्राच्या राजकारणातील विदूषक आहेत. त्यामुळे ते जे काही सांगतात ते केवळ मनोरंजन असते, त्यात वास्तव काहीही नसतं, असा टोला अमित साटम यांनी लगावला.

यावेळी मुंबईचं महापौरपद आणि शिंदेसेनेकडून झालेल्या महापौरपदाच्या मागणीबाबत विचारणा करण्यात आली असता अमित साटम म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या महायुतीच्या ११८ नगरसेवक, नगरसेविकांपैकी एक व्यक्ती मुंबईचा महापौर बनेल. आता महापौरपदी कुठल्या नगरसेवक वा नगरसेविकेची निवड होईल, याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करून घेतील. तसेच मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौरच विराजमान होईल, असेही अमित साटम यांनी यावेळी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Raut: A clown in Maharashtra politics, says Amit Satam.

Web Summary : Amit Satam criticized Sanjay Raut, calling him a 'clown' in Maharashtra politics, reacting to Raut's comments on Shinde's faction allegedly holding corporators in a hotel before Mumbai mayoral elections. Satam stated the BJP-Shinde alliance will decide the next mayor.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६अमित साटमशिवसेनाभाजपामुंबई महानगरपालिका