मुंबई मनपाचं महाबजेट: मुंबईकरांसाठी ४ नव्या योजनांची घोषणा, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 14:48 IST2024-02-02T14:47:21+5:302024-02-02T14:48:58+5:30
मुंबई महानगरपालिकेचा वित्तीय वर्ष २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शुक्रवारी सादर केला.

मुंबई मनपाचं महाबजेट: मुंबईकरांसाठी ४ नव्या योजनांची घोषणा, जाणून घ्या...
मुंबई-
मुंबई महानगरपालिकेचा वित्तीय वर्ष २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शुक्रवारी सादर केला. मुंबई मनपाचा यंदा तब्बल ५९,९५४ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी चहल यांनी मुंबईकरांसाठी ४ नव्या योजनांचीही घोषणा केली. यंदाच्या वर्षात या चार योजनांचा मुंबईकरांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा चहल यांनी केला आहे.
अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या ४ महत्वाच्या योजना...
१. मुख्यमंत्री शून्य प्रिस्क्रिप्शन योजना
मनपाच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना बाहेरुन औषधं खरेदी करण्यासाठीचं प्रिस्क्रिप्शन दिलं जाणार नाही. सर्व आवश्यक औषधं रुग्णालयाकडूनच दिली जाणार
२. धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना
यलो कार्डधारक दिव्यांगांना दर ६ महिन्यांनी ६ हजार रुपये, तर ब्लू कार्डधारक दिव्यांगांना दर ६ महिन्यांनी १८ हजार रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार. एकूण ५९,११५ दिव्यांगांना होणार फायदा.
३. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरितीकरण प्रकल्प
शहरात एकूण ५ लाख बांबूची झाडं लावली जाणार. भांडूप ते कन्नमवारनगर ३ किमी लांबीची 'बांबूवॉल' उभारणार.
४. मुंबई महिला सुरक्षा अभियान
महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष ड्राइव्ह, उपक्रम आणि योजनांसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद. एक विशेष मोबाइल अॅप तयार केलं जाणार.