मुंबई महापालिका आयुक्त आज लोकमत युट्यूबवर; जाणून घ्या, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 05:43 AM2021-05-21T05:43:03+5:302021-05-21T05:44:30+5:30

मुंबई महापालिकेत आल्यापासून त्यांचे मुंबईकरांसाठीचे हे पहिलेच युट्यूब आणि फेसबुकवरील लाईव्ह आहे.

Mumbai Municipal Commissioner Lokmat on YouTube today; Know the answers to the your questions | मुंबई महापालिका आयुक्त आज लोकमत युट्यूबवर; जाणून घ्या, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

मुंबई महापालिका आयुक्त आज लोकमत युट्यूबवर; जाणून घ्या, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

Next

 मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे आज, शुक्रवारी लोकमत युट्यूब आणि लोकमत फेसबुकच्या माध्यमातून मुंबईकरांना थेट भेटणार आहेत.

कोरोना कालावधीत मुंबई कशी नियंत्रणात आली, इथपासून ते तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून जाणून घेता येतील. तुम्ही तुमचे प्रश्न युट्यूबवरून किंवा फेसबुकवरून थेट विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरे ते देतील. प्रश्न विचारताना तुम्ही कोणत्या विभागातून प्रश्न विचारत आहात, त्या विभागाचे नाव आणि तुमचे नाव, तसेच प्रश्न लिहा म्हणजे तो त्यांना विचारता येईल. या मुलाखतीचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी करणार आहेत. मुंबई महापालिकेत आल्यापासून त्यांचे मुंबईकरांसाठीचे हे पहिलेच युट्यूब आणि फेसबुकवरील लाईव्ह आहे. थेट लोकांच्या प्रश्नांना उत्तरे, असा कार्यक्रम त्यांनी कोणासोबतही केलेला नाही.

Web Title: Mumbai Municipal Commissioner Lokmat on YouTube today; Know the answers to the your questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.