Join us  

CoronaVirus News: पुणे, ठाण्यापाठोपाठ आता मुंबईतही लॉकडाऊन?; आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 5:59 PM

ठाणे आणि पुणे या शहरांपेक्षा मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे.

राज्यात अनलॉक व मिशन बिगेन अगेन ही प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने पुणे, ठाणे, रायगडसह अन्य जिल्ह्यांनी पुन्हा एकदा 10 ते 15  दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र ठाणे आणि पुणे या शहरांपेक्षा मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा १०० टक्के लॉकडाऊन करण्याची गरज नाही, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे. 

पुणे आणि ठाणे यांसारख्या शहरांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज पडतेय. मात्र, या शहरांच्या तुलनेत मुंबई कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरत असल्याचं चित्र आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णणसंख्या असलेल्या मुंबईत रुग्णणसंख्या दुपटीचा कालावधीनं पन्नाशी गाठली आहे. तर मुंबईतला रुग्णणवाढीचा वेगही मंदावला आहे. पुढील काही दिवसांत यात आणखी सुधारणा होईल. त्यामुळे  हे सर्वांचे सामूहिक यश असल्याचेही इकबाल चहल यांनी सांगितले. एबीपी माझा या वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इक्बाल चहल यांनी हे स्पष्ट केलं आहे.

ठाण्यात रुग्णणवाढीचा वेग 3.2% आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधीही केवळ 25.13 दिवसांचा आहे. तसेच पुण्यात रुग्णदुपटीचा कालावधी 19.7 दिवस आहे तर रुग्णावाढीचा वेग 4 टक्के आहे. त्यामुळे पुणे आणि ठाणे शहरांच्या तुलनेत मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे. 

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात व रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा दहा दिवसांचा लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. तर, ठाण्यात लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत नेमका काय निर्णय घेतला जाणार याविषयी मुंबईकरांच्या मनात धाकधूक होती. मात्र, इकबाल चहल यांनी मुंबईत लॉकडाऊन करणार नाही, असं स्पष्ट केल्याने मुंबईकरांना मात्र यामुळे दिलासा मिळणार आहे. 

प्रमुख शहरांतील कोरोना संक्रमणाची स्थिती-

शहर        एकूण संक्रमित           बरे झाले (%)                 मृत्यू (%)दिल्ली     ११0९२१                       ८७६९२ (७९.0६%)       ३३३४ (३.0१%)मुंबई      ९१,७४५                         ६३४३१ (६९.१४%)        ५२४४ (५.७२%)चेन्नई      ७६,१५८                         ५६९४७ (७४.७७%)     १२१८ (१.६0%)ठाणे       ५९,४८७                         २५८२९ (४३.४२%)       १५९८ (२.६९%)पुणे         ३८,३५६                         १६0१६ (४२.८७%)      १0६0 (२.८४%)अहमदाबाद २२,९२३                    १७७८९ (७७.६0%)     १५१५ (६.६१%)

अन्य महत्वाच्या बातम्या- 

Rajasthan Political Crisis: ...म्हणून सचिन पायलट यांचे बंड झाले थंड?; राहुल गांधींनी धाडला होता खास निरोप

Rajasthan Political Crisis: महाराष्ट्रातील विश्वासू चेहरा होणार राजस्थानला रवाना; राहुल गांधींनी दिले आदेश

Rajasthan Political Crisis: काँग्रेस अजूनही आशावादी; सचिन पायलट यांना बैठकीत सहभागी होण्याचे निमंत्रण

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉकमुंबईमुंबई महानगरपालिका