मुंबईची मॉर्निंग : ठंडा ठंडा... कूल कूल...; बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० अंशाखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 09:08 IST2021-12-26T08:51:53+5:302021-12-26T09:08:20+5:30
Cold in Mumbai : राज्यासह मुंबईत ठिकठिकाणी किमान तापमानात घसरण झाली आहे. त्यामुळे रात्रीसह दिवसदेखील गार होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान १० अंशांवर खाली आले आहे, तर मुंबईचे किमान तापमान १८ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.

(छाया: स्वप्निल साखरे)
मुंबई : मुंबईच्या किमान तापमानात घसरण नोंदविण्यात येत असतानाच आता येथील कमाल तापमानात देखील घट होत आहे. मुंबईमधील बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० अंशाखाली नोंदविण्यात येत मुंबईकरांचा दिवस किंचित का होईना गार होत असल्याचे चित्र आहे.
राज्यासह मुंबईत ठिकठिकाणी किमान तापमानात घसरण झाली आहे. त्यामुळे रात्रीसह दिवसदेखील गार होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान १० अंशांवर खाली आले आहे, तर मुंबईचे किमान तापमान १८ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.
- मुंबईचे कमाल तापमान ३२ अंशांच्या घरात नोंदविण्यात येत होते. आता यात आणखी घसरण झाली आहे. हे किमान तापमान ३० अंशांखाली घसरले आहे. तर कमाल आणि किमान तापमानात घसरण झाल्याने रात्रीसोबत दिवसदेखील किंचित गारेगार आहे.
किमान तापमान
२० डिसेंबर १९.२
२१ डिसेंबर १८.६
२२ डिसेंबर १८.६
२३ डिसेंबर १७.९
२४ डिसेंबर १८.४
२५ डिसेंबर १८.२
कमाल तापमान
२१ डिसेंबर ३२.५
२२ डिसेंबर ३०.२
२३ डिसेंबर २९.४
२४ डिसेंबर २८