Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईची मेट्रो आजपासून आणखी वेगाने धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 14:35 IST

महामुंबई मेट्रोकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पश्चिम उपनगरात सुरू करण्यात आलेल्या मेट्रो मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुरू करण्यात आलेल्या मेट्रोला तुफान प्रतिसाद मिळत असून, नुकतेच या मेट्रो मार्गाने दोन कोटी प्रवाशांचा टप्पा पार केला होता. या मेट्रोचे प्रवासी दिवसागणिक वाढत असल्याने मेट्रो प्राधिकरणाने आता प्रवाशांना अधिकाधिक सेवा मिळाव्यात यासाठी मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रो मार्गावर ८ फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून आठ फेऱ्या मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. दहिसर पूर्व ते डीएन नगर, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मार्गांवरील फेऱ्या वाढणार आहेत.

महामुंबई मेट्रोकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पश्चिम उपनगरात सुरू करण्यात आलेल्या मेट्रो मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या सेवेत वाढ व्हावी यासाठी सोमवारपासून आठ फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, मेट्रोच्या सेवेत अधिकाधिक फेऱ्या कशा वाढविता येतील, यावर आम्ही सातत्याने लक्ष देत आहोत. आमच्या प्रवाशांना चांगली सेवा मिळावी यासाठी आम्ही काम करत आहोत. अधिक संख्येने प्रवासी आमच्याकडे येतील यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :मुंबईमेट्रो